शिक्षकांना कोविडच्या कामकाजातून मुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:18 IST2021-06-19T04:18:21+5:302021-06-19T04:18:21+5:30

विश्वास साबळे यांचा प्रभारी गटशिक्षण अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. पाटील म्हणाले, सर्व वयोगटांतील ...

Free teachers from Kovid's work | शिक्षकांना कोविडच्या कामकाजातून मुक्त करा

शिक्षकांना कोविडच्या कामकाजातून मुक्त करा

विश्वास साबळे यांचा प्रभारी गटशिक्षण अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. पाटील म्हणाले, सर्व वयोगटांतील शिक्षकांचे १०० टक्के लसीकरण व्हावे, यासाठी पंचायत समिती स्तरावर प्रयत्न व्हावेत. यावेळी विविध प्रश्नांसंदर्भात साबळे यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची ग्वाही साबळे यांनी दिली. यावेळी उपशिक्षणाधिकारी अमोल शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी शिक्षक अशोकराव पाटील, महादेवराव पवार, शिवरुद्र वठारे, पदवीधरचे तालुकाध्यक्ष सुनील माळवदे, ज्येष्ठ नेते एन.डी. कांबळे, केंद्रप्रमुख संभाजीराव कदम, दिलीपराव वाघमारे, चंद्रकांत पाटील, संदीप माने, भारत सूर्यवंशी, तानाजी कोडग, संतोष खोत यांच्यासह शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो : १८ शिरढाेण १

ओळ : कवठेमहांकाळ येथे प्रभारी गटशिक्षण अधिकारी विश्वास साबळे यांच्या अजितराव पाटील यांनी सत्कार केला. यावेळी अशोक पाटील, महादेव पवार उपस्थित होते.

Web Title: Free teachers from Kovid's work