चोपडे डेंटल क्लिनिकतर्फे मोफत तपासणी शिबिराचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:32 IST2021-08-14T04:32:30+5:302021-08-14T04:32:30+5:30
कुपवाड : अत्याधुनिक दंत वैद्यकीय उपचारासाठी प्रसिद्ध असलेल्या विजयनगर येथील चोपडे डेंटल क्लिनिक इंप्लान्ट व रूट कॅनॉल सेंटरच्या सातव्या ...

चोपडे डेंटल क्लिनिकतर्फे मोफत तपासणी शिबिराचे आयोजन
कुपवाड : अत्याधुनिक दंत वैद्यकीय उपचारासाठी प्रसिद्ध असलेल्या विजयनगर येथील चोपडे डेंटल क्लिनिक इंप्लान्ट व रूट कॅनॉल सेंटरच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी मोफत तपासणी व विशेष सवलत उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. चोपडे हे सांगली-मिरजच्या मध्यवर्ती ठिकाणी विजयनगर येथे २०१७ पासून सेवा देत आहेत. चोपडे हे एमडीएस असून त्यांनी इंप्लान्ट या अत्याधुनिक उपचार पद्धतीमध्ये विशेष प्रावीण्य मिळविले आहे. गेल्या सहा वर्षांचा आढावा घेता चोपडे डेंटल क्लिनिकने इंप्लान्ट व रूट कॅनॉल सेंटरच्या माध्यमातून अत्याधुनिक डेंटल इंप्लान्ट या उपचार पद्धतीचा वापर करून ७०० हून अधिक नागरिकांना सेवा दिली आहे. चोपडे यांनी रूट कॅनॉल, डेंटल ब्लिचिंग, वेडेवाकडे दात आदी समस्यांवर यशस्वी उपचार केले आहेत.
चोपडे यांनी मौखिक आरोग्याबद्दल जागृती व्हावी यासाठी विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. या विशेष शिबिरामध्ये १५ ऑगस्ट रोजी मोफत तपासणी व सल्ला दिला जाईल. उपचार खर्चामध्ये सूट दिली जाणार आहे. शिबिरात डेंटल इंप्लान्ट, रूट कॅनॉल व वेडेवाकडे दात किंवा दातामधील फटी कमी करणे या उपचारावर विशेष सूट मिळणार आहे. डॉक्टर, आरोग्यसेवक, पोलीस, सैनिकांच्या परिवारासाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी इतर सवलतीपेक्षा जादा सवलत देण्याचा मनोदय असल्याचे डॉ. चोपडे यांनी सांगितले. त्याचबरोबर काेरोनामुळे पालक गमावलेल्या पाल्यासाठीही विशेष सूट मिळणार आहे.