खंबाळे येथील मोफत कोविड सेंटरला मदतीसाठी चिमुरड्यांनी खाऊचे पैसे आमदार अनिल बाबर यांच्याकडे देऊन सहभाग नोंदवला.
आळसंद : खानापूर तालुक्यातील खंबाळे (भा.) येथील ग्रामपंचायतीने लोकसहभातून मोफत जय हनुमान कोविड सेंटर सुरू केले आहे. या विलगीकरण केंद्राचे लोकार्पण आमदार अनिल बाबर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी संतोष भोर, तालुका वैद्यकीय अधिकारी अनिल लोखंडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती महावीर शिंदे, सरपंच अमोल सुर्वे, सुभाष पवार उपस्थित होते.
हे रुग्णालय उभारण्यासाठी रवींद्र निकम यांच्यासह ग्रामस्थांनी लोकवर्गणी देऊन सहकार्य केल्याचे मत सरपंच सुर्वे यांनी व्यक्त केले.
यावेळी विजय सुर्वे, सचिन सुर्वे, साहेबराव सुर्वे, राजेंद्र सुर्वे, रमेश पाटील, संजय मोहिते, सुरेश सुर्वे, नवनाथ जावीर उपस्थित होते.
चौकट :
चिमुरड्यांचा सहभाग...
खंबाळे येथील लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरला समर्थ सचिन सुर्वे व योगेश्वरी सचिन सुर्वे या चिमुरड्यांनी खाऊसाठी साठवलेली रक्कम अनिल बाबर यांच्याकडे सुपुर्द केली.