विट्यात लॉकडाऊनमध्ये लोकांना मोफत घरपोहोच भाजीपाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:26 IST2021-05-10T04:26:19+5:302021-05-10T04:26:19+5:30
कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन सुरू आहे. विटा शहरात तर यापूर्वीपासूनच जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून शहरात ...

विट्यात लॉकडाऊनमध्ये लोकांना मोफत घरपोहोच भाजीपाला
कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन सुरू आहे. विटा शहरात तर यापूर्वीपासूनच जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून शहरात जीवनावश्यक वस्तू मिळत नसल्याने लोकांचे मोठे हाल सुरू आहेत. त्यामुळे सामाजिक बांधीलकी जोपासत लॉकडाऊनमध्ये लोकांना मदत करण्याचा निर्णय खानापूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला.
त्यामुळे रविवारी तालुकाध्यक्ष साजीद आगा यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मोफत भाजीपाला वाटप करण्याचा निर्णय घेतला. विटा येथील हराळे मळा येथे सुमारे शंभर कुटुंबातील लोकांना तालुकाध्यक्ष आगा यांच्या हस्ते भाजीपाल्याचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष सुजित पोद्दार, शहर उपाध्यक्ष सूरज तांबोळी, कृष्णत देशमुख, तालुका उपाध्यक्ष विनोद कांबळे, चैतन्य गायकवाड, सुशीलकुमार शिंदे, अपुल बुधावले यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट :
मनसेचा लोकांना आधार...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून लॉकडाऊनमध्ये लोकांना आधार देण्याचे काम केले आहे. भविष्यातही येणाऱ्या कोणत्याही संकटाला न घाबरता महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकांच्या अडी-अडचणी सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याची ग्वाही मनसेचे तालुकाध्यक्ष साजीद आगा यांनी दिली.
फोटो : ०९ विटा १
ओळ : विटा शहरात लॉकडाऊन व जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने लोकांना मोफत घरपोहोच भाजीपाला वाटप करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष साजीद आगा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.