दहा महिन्यांच्या अलोकच्या ह्रदयाची मोफत शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:20 IST2021-05-28T04:20:24+5:302021-05-28T04:20:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : उत्तर प्रदेशमधून रोजगारानिमित्त इस्लामपूरला आलेल्या भारती कुटुंबातील १० महिन्यांच्या अलोकच्या हृदयाची शस्त्रक्रिया जयंत दारिद्र्य ...

दहा महिन्यांच्या अलोकच्या ह्रदयाची मोफत शस्त्रक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : उत्तर प्रदेशमधून रोजगारानिमित्त इस्लामपूरला आलेल्या भारती कुटुंबातील १० महिन्यांच्या अलोकच्या हृदयाची शस्त्रक्रिया जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानातून केली आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांना बाळाच्या प्रकृतीची चौकशी वडील मुंजे भारती व आई पूजा भारती यांच्याकडे केली.
पालकमंत्री जयंत पाटील, युवा नेते प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियान राबविले जात आहे. जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानाचे समन्वयक इलियास पिरजादे, संघटक राजाराम जाधव यांनी या कुटुंबाशी संपर्क केला. अलोकच्या हृदयाची शस्त्रक्रिया मुंबई येथील एसआरसीसी चाईल्ड हॉस्पिटलमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत करून घेतली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, एसआरसीसी चाईल्ड हॉस्पिलच्या एच. आर. रश्मी, घरमालक अमीर शेख, महिला राष्ट्रवादीच्या प्रतिभा पाटील यांचे यासाठी मोठे सहकार्य मिळाले.
भारती कुटुंबाने जयंत पाटील यांची राजाराम नगर येथे भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. पाटील यांनी बाळाच्या प्रकृतीची चौकशी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, राज्य सरचिटणीस अरुण कांबळे, जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानचे समन्वयक इलियास पिरजादे, संघटक राजाराम जाधव उपस्थित होते.