मे मध्ये मोफत धान्य वितरित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:24 IST2021-05-01T04:24:52+5:302021-05-01T04:24:52+5:30

शेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन घोषित केला आहे. संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक सेवांचा भाग म्हणून शासनाकडील नियमित स्वरुपातील ...

Free grain will be distributed in May | मे मध्ये मोफत धान्य वितरित होणार

मे मध्ये मोफत धान्य वितरित होणार

शेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन घोषित केला आहे. संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक सेवांचा भाग म्हणून शासनाकडील नियमित स्वरुपातील स्वस्त दरातील धान्य हे रास्त भाव धान्य दुकानदारांमार्फत मोफत स्वरुपात देण्याचे आदेश आहेत. त्यानुसार मे २०२१ करिता तालुक्यातील अन्नसुरक्षा व अंत्योदय लाभार्थीना मोफत धान्य वितरित केले जाणार आहे. अशी माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे दिली आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, हे धान्य हे नियमित प्रमाणानुसारच प्रति माणसी गहू ३ व तांदूळ २ असे एकूण ५ किलो अन्नसुरक्षा लाभार्थी यांना, तर अंत्योदय लाभार्थी कार्डधारकांना नियमित प्रमाणानुसार गहू २५ व तांदूळ १० असे प्रति कार्डधारकास ३५ किलो धान्य वितरण केले जाणार आहे. याशिवाय केंद्र शासनाकडील पंतप्रधान गरीब कुटुंब कल्याण योजनेद्वारे मागील वर्षीप्रमाणे यावर्षी मे व जून २०२१ करिता अन्नसुरक्षा व अंत्योदय लाभार्थींना ऑनलाईन प्रणालीद्वारे प्रति माणसी गहू ३ किलो व तांदूळ २ किलो असे एकूण पाच किलो मोफत धान्य वितरित केले जाणार आहे. मे व जून २०२१ करिता केंद्र शासनाचे पीएमजीकेवाय योजनेच्या मोफत लाभाव्यतिरिक्त शासनाकडील नियमित स्वस्त दरातील धान्य माहे मे २०२१ मध्ये मोफत, तर जून २०२१ करिता नियमित स्वस्त दराने वितरित केले जाणार आहे.

Web Title: Free grain will be distributed in May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.