शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
4
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
5
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
6
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
7
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
8
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
9
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
10
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
11
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
12
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
13
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
14
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
15
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
16
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
17
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
18
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
19
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
20
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...

पूरबाधित 74 हजाराहून अधिक कुटूंबांना मोफत धान्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 15:33 IST

सांगली शहरासह जिल्ह्यातील 74 हजार 29 कुटुंबांना 30 ऑगस्ट अखेर एकूण 7402.9 क्विंटल गहू व 7402.9 क्विंटल तांदूळ मोफत वाटप करण्यात आले असून उर्वरीत पूरबाधितांना मोफत धान्य वाटपाची प्रक्रिया सुरू आहे.

ठळक मुद्देपूरबाधित 74 हजाराहून अधिक कुटूंबांना मोफत धान्य वाटपजिल्ह्यात 4 1कोटी 51 लाख 75 हजार सानुग्रह अनुदान वितरीत

सांगली : सांगली शहरासह जिल्ह्यातील 74 हजार 29 कुटुंबांना 30 ऑगस्ट अखेर एकूण 7402.9 क्विंटल गहू व 7402.9 क्विंटल तांदूळ मोफत वाटप करण्यात आले असून उर्वरीत पूरबाधितांना मोफत धान्य वाटपाची प्रक्रिया सुरू आहे.

सांगली शहरासह जिल्ह्यातील पलूस, वाळवा, मिरज व शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने पुरामुळे सुमारे 104 गावे बाधित झाली. मदत व पुनर्वसनासाठी पूरपश्चात उपाययोजना अत्यंत गतीने सुरू आहेत.

तसेच एकूण 58 हजार 824 इतक्या बाधित कुटूबांना 5 लिटर प्रमाणे 2 लाख 94 हजार 120 लिटर केरोसीन वाटप करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिली.जिल्ह्यात 4 1कोटी 51 लाख 75 हजार सानुग्रह अनुदान वितरीत पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी 5 हजार या प्रमाणे 83 हजार 35 कुटुंबाना 41 कोटी 51 लाख 75 हजार इतके सानुग्रह अनुदान रोखीने वाटप करण्यात आले आहे. तर 5 हजार रूपये वजा जाता उर्वरित 15 कोटी 79 लाख 60 हजार रूपयांची रक्कम धनादेशाव्दारे त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.सांगली शहरासह जिल्ह्यातील 104 गावांना महापुराचा मोठ्याप्रमाणावर फटका बसला आहे. लोकांना तात्काळ मदत म्हणून सानुग्रह अनुदान शहरी भागात 15 हजार तर ग्रामीण भागात 10 हजार या प्रमाणे वितरित करण्यात येत आहे. यातील 5 हजार रुपये रोखीने तर उर्वरित रक्कम बँकेत धनादेशाद्वारे जमा करण्यात येत आहे.जिल्ह्यात 30 ऑगस्ट अखेर ग्रामीण भागातील 45 हजार 195 कुटूंबे व शहरी भागातील 42 हजार 646 कुटूंबे बाधित झाली होती. त्यापैकी ग्रामीण भागातील 43 हजार 490 व शहरी भागातील 39 हजार 545 कुटूंबांना 5 हजार रूपये या प्रमाणे रोखीने रक्कम वितरीत करण्यात आली आहे. तर ग्रामीण भागातील 26 हजार 262 व शहरी भागातील 2 हजार 665 अशा एकूण 28 हजार 927 अनुदान 15 कोटी 79 लाख 60 इतके अनुदान बँकेत जमा करण्यात आले आहे.यामध्ये मिरज तालुक्यातील 20 पुरामुळे बाधीत झाले असून यातील ग्रामीण भागातील 13 हजार 624 तर शहरी भागाती 39 हजार 530 कुटुंबाना 26 कोटी 57 लाख 70 हजार रोखीने तर ग्रामीण भागातील 7 हजार 405 व शहरी भागातील 2 हजार 650 कुटुंबाना 6 कोटी 35 लाख 25 हजार रुपये बँकेत धनादेशाद्वारे जमा करण्यात आले आहेत.वाळवा इस्लामपूर तालुक्यातील 38 गावे पुरामुळे बाधित झाली आहेत. यामध्ये 12 हजार 842 कुटुंबाना 6 कोटी 42 लाख 10 रुपये रोखीने तर 9 हजार 579 कुटुंबाना 4 कोटी 78 लाख 95 हजार धनादेशाद्वारे वाटप करण्यात आले आहे.शिराळा तालुक्यातील 21 गावे पुरामुळे बाधित असून 613 कुटुंबाना 30 लाख 65 रोखीने तर 612 कुटुंबाना 30 लाख 60 हजार इतकी रक्कम बँकेत धनादेशाद्वारे जमा करण्यात आले आहे.पलूस तालुक्यातील 25 गावे पुरामुळे बाधित असून 16 हजार 411 ग्रामीण तर 15 शहरी कुटुंबांना 8 कोटी 21 लाख 30 हजार रोखीने आणि 8 हजार 666 ग्रामीण व 15 शहरी कुटुंबाना 4 कोटी 34 लाख 80 हजार इतकी रक्कम धनादेशाद्वारे वितरित करण्यात आली आहे. 

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरcollectorजिल्हाधिकारी