जत तालुक्यात मोफत धान्य वितरण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:25 IST2021-05-14T04:25:27+5:302021-05-14T04:25:27+5:30
संख : संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक सेवांचा भाग म्हणून राज्य शासनाचे नियमित स्वरुपातील मे महिन्यातील धान्य जत तालुक्यातील १७७ ...

जत तालुक्यात मोफत धान्य वितरण होणार
संख : संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक सेवांचा भाग म्हणून राज्य शासनाचे नियमित स्वरुपातील मे महिन्यातील धान्य जत तालुक्यातील १७७ दुकानदारांमार्फत मोफत स्वरुपात वितरीत केले जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.
प्रति माणसी गहू ३ व तांदूळ २ असे एकूण ५ किलो अन्नसुरक्षा लाभार्थी यांना तर अंत्योदय लाभार्थी कार्डधारकांना नियमित प्रमाणानुसार गहू २५ व तांदूळ १० किलो असे प्रति कार्डधारकाला ३५ किलो धान्य वितरण केले जाणार आहे.
केंद्र शासनाकडील पंतप्रधान गरीब कुटुंब कल्याण योजनेव्दारे प्रति माणसी ३ किलो गहू व तांदूळ २ किलो असे एकूण ५ किलो मोफत धान्य वितरीत केले जाणार आहे.