पूरग्रस्तांना राज्य शासनामार्फत मोफत धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:28 IST2021-07-27T04:28:21+5:302021-07-27T04:28:21+5:30
सांगली : राज्यातील पूरग्रस्त नागरिकांना अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत मोफत धान्य देण्यात येईल, अशी घोषणा अन्न व नागरी ...

पूरग्रस्तांना राज्य शासनामार्फत मोफत धान्य
सांगली : राज्यातील पूरग्रस्त नागरिकांना अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत मोफत धान्य देण्यात येईल, अशी घोषणा अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, पूरग्रस्तांना धान्यस्वरूपात मदत देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर मदतीचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला १० किलो गहू, १० किलो तांदूळ, ५ लिटर केरोसीन, ५ किलो डाळ देण्यात येईल. याशिवाय पूरग्रस्त भागात तातडीने मदत करता यावी म्हणून पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी कायमस्वरूपी एनडीआरएफचे पथक नियुक्त करण्याबाबत राज्य शासन विचार करीत आहे.
सध्या ज्या पूरग्रस्त व्यापाऱ्यांनी विमा उतरविला आहे, अशा विमा कंपन्यांकडून पूरग्रस्त दुकानातील माल आहे त्या स्थितीत ठेवण्याची अट घातली आहे. ही अडेलतट्टू भूमिका योग्य नाही. त्यामुळे या प्रश्नीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. चित्रीकरण किंवा छायाचित्रांच्या आधारे व्यापाऱ्यांना विमा कंपन्यांनी भरपाई दिली पाहिजे. त्याबाबत आम्ही विमा कंपन्यांना समज देऊ, असे कदम यांनी स्पष्ट केले.