जत तालुक्यात रोज चार टन भाजीपाल्याचे मोफत वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:25 IST2021-05-23T04:25:29+5:302021-05-23T04:25:29+5:30

संख : लॉकडाऊनमुळे गोरगरिबांना भाजीपाला उपलब्ध होत नसल्यामुळे चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकारामबाबा महाराज यांनी जत तालुक्यातील बावीस हजार ...

Free distribution of four tons of vegetables daily in Jat taluka | जत तालुक्यात रोज चार टन भाजीपाल्याचे मोफत वाटप

जत तालुक्यात रोज चार टन भाजीपाल्याचे मोफत वाटप

संख : लॉकडाऊनमुळे गोरगरिबांना भाजीपाला उपलब्ध होत नसल्यामुळे चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकारामबाबा महाराज यांनी जत तालुक्यातील बावीस हजार कुटुंबीयांना रोज चार टन भाजीपाल्याचे वाटप केले. या स्तुत्य उपक्रमाचा सामान्यांना चांगला फायदा झाला आहे.

लाॅकडाऊनमुळे एका बाजूला पिकवलेला भाजीपाल्यास मागणी नाही. दुसऱ्या बाजूला आठवडी बाजार बंद असल्यामुळे सामान्य कुटुंबीयांना भाजीपालाच उपलब्ध होत नाही. सामान्य नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी शेतकऱ्यांकडून भाजीपाला विकत घेतला. रोज चार टन याप्रमाणे जत तालुक्यातील बावीस हजार हजार कुटुंबांना भाजीपाला मोफत त्यांच्या घरापर्यंत जाऊन पोच केले आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून घरपोच भाजीपाला थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून खरेदी करून गेारगरिबांच्या घरापर्यंत पोच करण्याचे काम सुरू ठेवले आहे. आतापर्यंत जत पूर्व भागातील उटगी, जाडबोबलाद, सोन्याळ लकडेवाडी, बंडगरवाडी, करेवाडी, को. बोबलाद, लवंगा, गारळेवाडी या गावात भाजीपाला बाबा स्वत: जाऊन पोच करीत आहेत.

यावेळी मानव मित्र संघटनेचे दत्ता साबळे, नागनाथ भिसे, सिद्राया मोरे, अब्बास नदाफ, ज्योती हारगे, शहारूख देशिंग आदी उपस्थित होते.

Web Title: Free distribution of four tons of vegetables daily in Jat taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.