एमआयडीसीत १०१५ कामगारांना मोफत कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:27 IST2021-09-11T04:27:20+5:302021-09-11T04:27:20+5:30

कुपवाड : कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्स आणि लघुउद्योग भारती यांच्या वतीने एमआयडीसीत मोफत कोरोना लसीकरण ...

Free corona vaccine to 1015 workers at MIDC | एमआयडीसीत १०१५ कामगारांना मोफत कोरोना लस

एमआयडीसीत १०१५ कामगारांना मोफत कोरोना लस

कुपवाड : कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्स आणि लघुउद्योग भारती यांच्या वतीने एमआयडीसीत मोफत कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेतून अवघ्या चार दिवसांत १०१५ कामगारांना लसीचा लाभ देण्यात आला. यासाठी विवेकानंद रुग्णालयाचे डॉ. राम लाडे यांच्या मार्गदर्शनाखालील वैद्यकीय पथकाचे सहकार्य मिळाले, अशी माहिती कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सतीश मालू यांनी पत्रकारांना दिली.

ते म्हणाले की, कृष्णा व्हॅली चेंबरच्या सभागृहामध्ये कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी कोविड लसीचे मोफत लसीकरणास शनिवार, ४ सप्टेंबरपासून सुरुवात झाली होती. कुपवाड, बामणोली, सावळी आणि सांगली औद्योगिक वसाहतीतील प्रत्येक कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ही मोहीम राबविली. अवघ्या चार दिवसांत १०१५ कामगारांनी मोफत लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला.

ते म्हणाले की, लसीकरण मोहिमेचा शेवट झाला असला तरी आम्ही आमची लसीकरण मोहीम थांबविलेली नाही. अजूनही कोणी लस घेण्यास इच्छुक असेल तर त्यांनी कृष्णा व्हॅली चेंबरच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन मालू यांनी केले आहे.

यावेळी लघु उद्योग भारतीचे माधव कुलकर्णी, विनोद पाटील, आर. डी. जाधव व बाळासाहेब गायकवाड विवेकानंद प्रतिष्ठानचे डॉ. राम लाडे, नितीन मारु याच्यासह कृष्णा व्हॅली चेंबरचे सर्व संचालक उपस्थित होते.

Web Title: Free corona vaccine to 1015 workers at MIDC