गाडगीळ यांच्या निधीतून कुपवाडसाठी मोफत रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:28 IST2021-05-21T04:28:13+5:302021-05-21T04:28:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कुपवाड : आमदार सुधीर गाडगीळ यांच्या निधीतून शहरवासीयांसाठी देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे सभागृह नेते व नगरसेवकांच्या हस्ते ...

Free ambulance for Kupwad from Gadgil's fund | गाडगीळ यांच्या निधीतून कुपवाडसाठी मोफत रुग्णवाहिका

गाडगीळ यांच्या निधीतून कुपवाडसाठी मोफत रुग्णवाहिका

लोकमत न्यूज नेटवर्क

कुपवाड : आमदार सुधीर गाडगीळ यांच्या निधीतून शहरवासीयांसाठी देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे सभागृह नेते व नगरसेवकांच्या हस्ते पूजन करून लोकार्पण करण्यात आले. गुरुवारपासून ही रुग्णवाहिका कुपवाडकरांच्या सेवेत दाखल झाली.

कुपवाड शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी रुग्णवाहिकेची मागणी केली जात होती. यासाठी नगरसेवक गजानन मगदुम यांनी आमदार सुधीर गाडगीळ व महापालिका आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा केला.

शहरातील रुग्ण सांगली व मिरजेला पाठविण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज भासत होती. त्यामुळे ही रुग्णवाहिका मिळाल्याने शहरवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे.

सभागृह नेते विनायक सिंहासने, नगरसेवक गजानन मगदुम, उपायुक्त स्मृती पाटील, सहायक आयुक्त दत्तात्रय गायकवाड, महिला बालकल्याण सभापती गीतांजली ढोपे-पाटील, नगरसेवक राजेंद्र कुंभार, नगरसेविका कल्पना कोळेकर, सोनाली सागरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे, डॉ. रवींद्र ताटे, यंत्रशाळा प्रमुख विकास पाटील, कुपवाड संघर्ष समितीचे माजी अध्यक्ष विजय खोत, अरुण रूपनर, रमेश जाधव, स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील, सिद्धांत ठोकळे, हणमंत सरगर आदी उपस्थित होते.

Web Title: Free ambulance for Kupwad from Gadgil's fund