पाडळीच्या ठेकेदाराची पाच लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:23 IST2021-04-05T04:23:59+5:302021-04-05T04:23:59+5:30
पेठ : पाडळी (ता. शिराळा) येथील ऊसतोडणी वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराची बीड आणि कोल्हापूर जिल्ह्यातील तिघांनी पाच लाख रुपयांची फसवणूक ...

पाडळीच्या ठेकेदाराची पाच लाखांची फसवणूक
पेठ : पाडळी (ता. शिराळा) येथील ऊसतोडणी वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराची बीड आणि कोल्हापूर जिल्ह्यातील तिघांनी पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. हा प्रकार नोव्हेंबर २० मध्ये घडला होता.
याबाबत सुखदेव सदाशिव नायकवडी (वय ५१,रा. पाडळी, ता. शिराळा) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार साहेबराव मोहन राठोड, मोहन देहू राठोड (दोघे रा. अंथरवण पिंपरी, जि. बीड) आणि विलास ज्ञानबा चुडमुंगे (रा. हनुमान टेकडी, शिरोळ, जि. कोल्हापूूर) या तिघाविरुद्ध फसवणुुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सुखदेव नायकवडी आणि त्यांचे मित्र अशोक जाधव, विठ्ठल जाधव (दोघे रा. दुधोंडी, ता. पलूस), दिलीप पाटील (रा. पुणदी, ता.पलूस) अशा सर्वांनी ऊसतोडणीसाठी मजूर घ्यायचे याकरिता विलास चुुडमुंगे याच्या सांगण्यावरून राठोड पिता-पुत्रांना धनादेश आणि फोन पेद्वारे पाच लाख रुपयांची रक्कम दिली होती. मात्र राठोड यांनी ऊसतोडणीसाठी मजूर पुरविले नाहीत तसेच पैसे देण्यासही नकार देत गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे नायकवडी यांनी पोलिसांत तिघांविरुद्ध फिर्याद दिली. सहायक फौजदार बळीराम घुुले अधिक तपास करीत आहेत.