वाळवा तालुक्यात ऊसतोडणी वाहतूकदारांची पाच कोटींची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:25 IST2021-02-12T04:25:06+5:302021-02-12T04:25:06+5:30
इस्लामपूर : बीड, उस्मानाबाद, जालना, अहमदनगर, नंदुरबार, धुळे जिल्ह्यांतील ऊसतोडणी मुकादमांनी वाळवा तालुक्यातील ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमालकांची कोट्यवधी ...

वाळवा तालुक्यात ऊसतोडणी वाहतूकदारांची पाच कोटींची फसवणूक
इस्लामपूर : बीड, उस्मानाबाद, जालना, अहमदनगर, नंदुरबार, धुळे जिल्ह्यांतील ऊसतोडणी मुकादमांनी वाळवा तालुक्यातील ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमालकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. हे पैसे वसूल करण्यास पोलीस खात्याने मदत करावी, अशी मागणी ट्रॅक्टरमालकांनी जिल्हा पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम यांच्याकडे केली आहे.
जिल्ह्यात फसवणूक केलेल्या तोडणी मुकादमांच्या विरोधी पोलीस गुन्हे दाखल करून घेण्यास मदत करूच, याशिवाय त्या भागातही पोलीस आपणास सहकार्य करतील, अशी ग्वाही गेडाम यांनी दिल्याने ट्रॅक्टरमालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी.आर. पाटील यांनी गेडाम यांच्याकडे निवेदन दिले. राजारामबापू कारखान्याच्या पुढाकाराने वाळवा तालुक्यातील ऊस वाहतूक ट्रॅक्टरमालकांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. संचालक विराज शिंदे, श्रेणिक कबाडे, माणिक शेळके, माजी संचालक नारायण पाटील, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, ऊस वाहतूक ट्रॅक्टरमालक संघटनेचे पोपटराव जगताप (येवलेवाडी), आर्चे राजू अत्तार, जितेंद्र शिंदे उपस्थित होते.
पी.आर. पाटील म्हणाले, वाळवा तालुक्यातील ६०-७० ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमालकांची साधारण पाप कोटी रुपयांवर फसवणूक झाली आहे. पैसे परत करण्याचा तगादा लावला असता त्यांच्याकडून खोटे गुन्हे दाखल केले जातात. मुकादमांना इकडे आणल्यास अपहरणासारख्या गुन्ह्यांना सामोरे जावे लागत आहे.
फोटो ओळी- ११०२२०२१-आयएसएलएम-फसवणूक निवेदन न्यूज
सांगली येथे जिल्हा पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम यांना पी.आर. पाटील यांनी ऊसतोडणी ट्रॅक्टरमालकांच्या वतीने निवेदन दिले. यावेळी विराज शिंदे, श्रेणिक कबाडे, पोपटराव जगताप, प्रशांत पाटील उपस्थित होते.