शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

एमबीबीएसला प्रवेशाचे आमिष दाखवत १५ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 19:12 IST

यादव कुटुंबाने प्रकाश इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन प्रवेश प्रक्रिया हाताळणाऱ्या खंडागळे यांच्याशी संपर्क साधल्यावर ६ एप्रिलपर्यंत शासनाच्या नियमानुसार ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितले. या प्रकाराने यादव कुटुंबीयांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

इस्लामपूर: वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेची मुदत संपूनही पुण्यातील एका मुलीस प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत पलूस तालुक्यातील तिघांनी १५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार जानेवारी ते एप्रिल २२ या कालावधीत घडला आहे.याबाबत डॉ. सुवर्णा सतीश यादव (५०, रा. शंकरमहाराज मठाजवळ, पुणे) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून ज्ञानेश्वर बाबूराव पाटील (मूळ रा. नागराळे-पलूस, सध्या-पुणे), स्नेहल संभाजी पवार (कुंडल, ता. पलूस, सध्या-पुणे) आणि हर्षल डाके (कुंडल) या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.डॉ. सुवर्णा यादव यांचे मूळ गाव इस्लामपूर आहे. त्यांच्या मुलीस एमबीबीएसला प्रवेश घेण्यासाठी त्या प्रयत्न करीत होत्या. त्यावेळी त्यांना या तिघांनी प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकलमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यांच्याकडे पाटील याने ३० लाख रुपयांची मागणी केली. मात्र त्याला यादव यांनी तयारी दाखवली नाही. तरीपण ज्ञानेश्वर पाटील हा प्रवेश मिळवून देतोच अशी बतावणी करत होता. शेवटी त्याला यादव यांनी १९ लाख रुपये दिले.

त्यावर या त्रिकुटाने यादव यांना भुलवत ठेवले. तुमच्या मुलीचा प्रवेश झाला आहे. तिला उद्यापासून पाठवून द्या असे सांगत राहिले. यादव यांनी पैसे भरल्याची पावती आणि प्रवेश मिळाल्याची कागदपत्रांची मागणी केली. ती या भामट्यांनी दिलीच नाहीत. १२ एप्रिलपर्यंत ते यादव यांना काम झाल्याचे सांगत राहिले. शेवटी यादव कुटुंबाने प्रकाश इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन प्रवेश प्रक्रिया हाताळणाऱ्या खंडागळे यांच्याशी संपर्क साधल्यावर ६ एप्रिलपर्यंत शासनाच्या नियमानुसार ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितले.या प्रकाराने यादव कुटुंबीयांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. शेवटी यादव यांनी या भामट्यांकडे पैशाची मागणी केल्यावर त्यांनी ३ लाख ९० हजार रुपये परत दिले. उर्वरित रकमेचा धनादेश दिला. मात्र तो न वटल्याने डॉ. सुवर्णा यादव यांनी पोलिसात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण अधिक तपास करत आहेत.

एमबीबीएस पदवीची प्रवेश प्रक्रिया ही शासनस्तरावर नियमानुसार व गुणवत्तेवर होत असते. या प्रवेश प्रक्रियेशी महाविद्यालयाचा संबंध येत नाही. संबंधित पालक व त्यांची फसवणूक केलेल्या व्यक्तीविरोधात महाविद्यालयाची बदनामी केल्याबद्दल कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करणार आहोत.  संजय शामराव जाधव, अध्यक्ष, प्रकाश इन्स्टिट्यूट, इस्लामपूर

टॅग्स :Sangliसांगलीdoctorडॉक्टरfraudधोकेबाजी