शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

Sangli: वाईन शॉप परवान्याच्या नावाखाली ५० लाखांची फसवणूक, दोन भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 13:16 IST

विटा : वाईन शॉपचा नवीन परवाना काढून देण्याचे आमिष दाखवून विटा येथील यंत्रमागधारक संजय हरिश्चंद्र तारळेकर यांना ५० लाख ...

विटा : वाईन शॉपचा नवीन परवाना काढून देण्याचे आमिष दाखवून विटा येथील यंत्रमागधारक संजय हरिश्चंद्र तारळेकर यांना ५० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार सोमवारी रात्री उघडकीस आला. याप्रकरणी अरुण अर्जुन मोरे (पो. वर्ये, ता., जि. सातारा) व अनिल विष्णू सावंत (रा. मालतवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) या दोन भामट्यांविरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.विटा येथील संजय तारळेकर यांचा टेक्सटाइल्स व्यवसाय आहे. वाईन शॉपचा परवाना घेण्यासाठी ते प्रयत्न करीत होते. त्यावेळी दि. ११ मे २०२० च्या दरम्यान त्यांना त्यांच्या एका मित्राने वाईन शॉपचा परवाना काढून देणारे लोक आहेत. त्यांच्याशी संपर्क करूया असे सुचविले. त्यानंतर त्यांनी संशयित अरुण मोरे व अनिल सावंत या दोघांशी संपर्क साधला.त्यावेळी त्यांनी थेट मंत्रालयात फिल्डिंग लावून नवीन वाईन शॉपसाठी परवाना देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर नवीन परवान्यासाठी संजय तारळेकर यांनी मे २०२० ते आतापर्यंत जवळपास ५० लाख रुपयांची रक्कम संशयितांच्या बँक खात्यावर वर्ग केली. त्यानंतर या दोघांनी तारळेकर यांना अधूनमधून काही कागदपत्रे दिली. मात्र, त्यातील कागदपत्रे बनावट असल्याचे तारळेकर यांच्या निदर्शनास येऊ लागले.त्यामुळे तारळेकर यांनी दिलेले पैसे परत द्यावेत, अशी मागणी दोघांकडे केली. परंतु पैसे देण्यास दोघांनीही टाळाटाळ केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संजय तारळेकर यांनी संशयित अरुण अर्जुन मोरे व त्याचा साथीदार अनिल विष्णू सावंत या दोन भामट्यांविरुद्ध सोमवारी रात्री विटा पोलिसांत गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक शरद मेमाणे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी