ऊस वाहतूकदाराची १४ लाख ६० हजारांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:32 IST2021-02-17T04:32:49+5:302021-02-17T04:32:49+5:30

झळके यांच्या तक्रारीनुसार परेश्वर रावजी अडे, रोहितदास तुकाराम जाधव, कृष्णा कैलास जाधव, गजानन धोंडू पवार, लक्ष्मण दलसिंग पवार, परमेश्वर ...

Fraud of 14 lakh 60 thousand of sugarcane transporter | ऊस वाहतूकदाराची १४ लाख ६० हजारांची फसवणूक

ऊस वाहतूकदाराची १४ लाख ६० हजारांची फसवणूक

झळके यांच्या तक्रारीनुसार परेश्वर रावजी अडे, रोहितदास तुकाराम जाधव, कृष्णा कैलास जाधव, गजानन धोंडू पवार, लक्ष्मण दलसिंग पवार, परमेश्वर लालसिंग राठोड, सुरेश उत्तम पवार, गणेश लालसिंग राठोड (सर्व रा. संक्राळा, ता. जिंतूर), विश्वंभर मारोतराव बीडगर (रा. वडगाव, ता. परभणी) व नारायण शिवाजी राठोड (रा. ता. परभणी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झळके हे सांगली व रायबाग येथील साखर कारखान्याचे ऊस वाहतूकदार आहेत. त्यांनी ऊसतोडीसाठी सप्टेंबर महिन्यात परभणी व वाशिम येथील आठ ऊसतोड मुकादमांना उसतोड मजुरांच्या आठ जोड्यांसाठी प्रत्येकी ७० हजार रुपयेप्रमाणे पाच लाख ६० हजार व विश्वंभर बीडकर, नारायण राठोड या दोघांना मजुरांच्या आठ जोड्यांसाठी नऊ लाख रुपये असे १४ लाख ६० हजार रुपये आगाऊ दिले. मात्र करार करुन आगाऊ पैसे घेतल्यानंतरही ऊसतोडणीसाठी टोळ्या आल्या नसल्याने झळके यांचे नुकसान झाले. झळके यांनी कामासाठी दिलेले पैसे परत मागितल्यानंतर संबंधित मुकादमांनी पैसे परत देण्यास टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने प्रवीण झळके यांनी ग्रामीण पोलिसात दहाजणांविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली आहे.

Web Title: Fraud of 14 lakh 60 thousand of sugarcane transporter