सिव्हिलमधील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:24 IST2021-01-21T04:24:12+5:302021-01-21T04:24:12+5:30
न्यायालयाने आदेश देऊनही रुग्णालयात गेली २५ ते ३० वर्षे काम करणारे सुमारे ८१ बदली कर्मचारी कायम होण्याच्या प्रतीक्षेत ...

सिव्हिलमधील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
न्यायालयाने आदेश देऊनही रुग्णालयात गेली २५ ते ३० वर्षे काम करणारे सुमारे ८१ बदली कर्मचारी कायम होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र शासनाकडून याबाबत टाळाटाळ सुरू आहे. शासनाने बदली कामगारांना कायम न केल्यास यापुढे बेमुदत उपोषणाचा इशारा जिल्हा महासंघाचे अध्यक्ष संजय व्हनमाने यांनी दिला. याबाबत अधिष्ठाता डाॅ. सुधीर नणंदकर यांना निवेदन देण्यात आले. अंबेजोगाई रुग्णालयात कर्मचाऱ्यांसोबत अपमानास्पद वर्तणुकीचा निषेध केला. याबाबत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यात आला. यावेळी जिल्हा सचिव गणेश धुमाळ, आलोक चव्हाण, विजय वाघोले, अन्वर कुरणे, विशाल म्हेतर, मोहन गवळी, मनोज कांबळे, प्रकाश घोडके, शशी कोलप, लता लोंढे, सुमन कामत, शारदा कांबळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
फाेटाे : २० मिरज २