मिरजेत पैसे मोजण्याच्या बहाण्याने बॅंकेत वृद्धेचे चौदा हजार लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:10 IST2021-01-13T05:10:37+5:302021-01-13T05:10:37+5:30

प्रज्ञा कांबळे व त्यांची आजी या दोघी युनियन बँकेच्या शाखेत पेन्शन व पोस्टाचे पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी ...

Fourteen thousand old lamps in the bank under the pretext of counting money in Miraj | मिरजेत पैसे मोजण्याच्या बहाण्याने बॅंकेत वृद्धेचे चौदा हजार लंपास

मिरजेत पैसे मोजण्याच्या बहाण्याने बॅंकेत वृद्धेचे चौदा हजार लंपास

प्रज्ञा कांबळे व त्यांची आजी या दोघी युनियन बँकेच्या शाखेत पेन्शन व पोस्टाचे पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी बँकेतून ४९ हजार रुपयांची रक्कम काढून पैसे मोजत असताना, त्यांच्याजवळ एक अज्ञात व्यक्ती आली. त्याने बँकेतून मिळालेल्या नोटा फाटक्या व खराब असतात. मी तुम्हाला व्यवस्थित मोजून देतो, असे म्हणत वृद्धेकडील नोटांचे बंडल हातात घेतले. पैसे मोजण्याचा बहाणा करून शिताफीने त्यातील १४ हजार रुपयांच्या नोटा काढून घेतल्या. उर्वरित नोटा वृद्धेकडे देऊन भामटा पसार झाला. वृद्धेची नात प्रज्ञा हिने पुन्हा नोटा मोजल्या असता ४९ हजार रुपयांच्या नोटांतून १४ हजार रुपये रक्कम कमी असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी अज्ञात भामट्याने पैसे मोजून देण्याच्या बहाण्याने १४ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार त्यांनी मिरज शहर पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Fourteen thousand old lamps in the bank under the pretext of counting money in Miraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.