शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत पंचायत समित्यांतील चार वर्षांचे प्रशासकराज अखेर संपुष्टात, जिल्हा परिषदेत बुधवारपर्यंत प्रशासकच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 18:45 IST

नवनिर्वाचित सदस्यांकडून लोकहिताच्या कामांची अपेक्षा

सांगली : पंचायत समित्यांतील प्रशासकराज तब्बल १ हजार ४५० दिवसांनी म्हणजे चार वर्षांनी संपुष्टात आले आहे. गेल्या दि. १० मार्च रोजी सभापती व उपसभापती निवडी झाल्यानंतर लोकनियुक्त सदस्यांचा कार्यकाल सुरू झाला आहे. यानिमित्ताने पंचायत समित्यांवर ऐतिहासिक म्हणता येईल इतका कालावधी प्रशासकराज राहिले आहे.जिल्हा परिषदेतही येत्या बुधवारी (दि. १८) अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडी होणार आहेत. त्यामुळे तब्बल १ हजार ४५८ दिवसांचे प्रशासकराज संपणार आहे. प्रशासकीय कालावधीत जिल्हा परिषदेत तीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशासक म्हणून काम केले. गेल्या पंचवार्षिकमधील सदस्यांचा कार्यकाल २० मार्च २०२२ रोजी संपला होता. त्यानंतर सातत्याने निवडणुका लांबत गेल्या. २०२२ मध्ये कोरोनामुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत. त्यानंतर ओबीसी आरक्षणाचा वाद आणि न्यायालयातील तारखा यामुळे निवडणुका लांबत गेल्या. सरतेशेवटी दि. ७ फेब्रुवारीस मतदान आणि दि. ९ फेब्रुवारीस मतमोजणी झाली. आता अध्यक्षनिवडीनंतर प्रशासकराज संपुष्टात येणार आहे. सुमारे ४ वर्षे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे कामकाज प्रशासकांनी चालविले होते. या काळात नागरिक आणि प्रशासन यांच्यात एकप्रकारे दुराव्याची स्थिती होती. गावस्तरावरील विकासकामांसाठी जोर कोण लावणार? असा प्रश्न होता. प्रशासक काळात प्रशासनाचे बहुतांश कामकाज योजना राबविण्याचेच झाले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज योजनेसह बहुतांश शासकीय योजनांवरच प्रशासनाचा भर राहिला होता. रस्ते, गटारी, स्वीय निधीचा खर्च, वर्गखोल्या, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे आदी कामांसाठी थेट ग्रामपंचायतींनाच जिल्हा परिषदेत धडका माराव्या लागल्या. लोकहिताच्या प्रश्नांवर उठणारे आवाज गायब झाले. जलजीवन मिशनची बिले थकल्याने कंत्राटदारांवर आत्महत्येची वेळ आली. जिल्हा नियोजन समिती, आमदार व खासदार निधीसाठी पाठपुरावा थांबला. आता आमदार, खासदारांचेच समर्थक निवडून आल्याने निधी मोठ्या प्रमाणात मिळण्याची अपेक्षा आहे.

दालनांचे नूतनीकरणपंचायत समितीत दि. १० मार्च रोजी प्रशासकराज संपले, तर जिल्हा परिषदेत येत्या बुधवारी (दि. १८) संपेल. नवे अध्यक्ष-उपाध्यक्ष व सभापतींच्या स्वागतासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. त्यांच्या दालनांचे नूतनीकरण केले जात आहे. गेल्या चार वर्षांत ही दालने रिकामीच पडू होती. त्यांचा वापर प्रशासकीय कामांसाठी केला जात होता. पदाधिकाऱ्यांची वाहनेदेखील अधिकाऱ्यांच्या तैनातीसाठी होती. ती आता पूर्ववत पदाधिकाऱ्यांकडे सुपुर्द करण्याची तयारी सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Panchayat Samiti's Administrator Rule Ends; Zilla Parishad Awaits Election

Web Summary : Sangli Panchayat Samiti's four-year administrator rule ended with new elections. Zilla Parishad awaits chairman election, ending its administrative period. Development suffered during this phase, with focus shifting to government schemes.