शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

मद्यपी नराधम बापानेच चार वर्षांच्या बालिकेचा केला खून, सांगलीतील कुरळप येथील संतापजनक घटना

By अशोक डोंबाळे | Updated: March 16, 2023 17:37 IST

औषधोपचारास कंटाळून कृत्य केल्याची माहिती, विहिरीत टाकल्याची पोलिसांना दिली कबुली

सांगली : कुरळप (ता. वाळवा) येथील चार वर्षांच्या दिव्यांग मुलीच्या औषधोपचाराचा खर्च करूनही तिच्यात सुधारणा होत नसल्यामुळे मद्यपी बापानेच तिला विहिरीत ढकलून मारल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. श्रीदेवी कोळी असे मृत मुलीचे नाव असून, तिचा बाप अण्णाप्पा तुकाराम कोळी (वय २७) याला अटक केली आहे. अण्णाप्पाचे भाऊ भीमराव कोळी यांनी कुरळप पोलिसांत फिर्याद दिली आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, अण्णाप्पा कोळी यांचे कुटुंब ‘पोतराज’चा व्यवसाय करीत असून, ते मागील १५ वर्षांपासून कुरळप येथे वास्तव्यास आहे. श्रीदेवी दिव्यांग होती. तिच्यावर कोळी कुटुंबीयांकडून औषधोपचार सुरू होते. मात्र, ती बरी होत नव्हती. यामुळे अण्णाप्पाला नैराश्य आले होते. तो मंगळवार, १४ मार्च रोजी रात्री दहाच्या दरम्यान दारू पिऊन घरी आला. यावेळी दारूच्या नशेतच घराजवळ असणाऱ्या मेतुगडे यांच्या विहिरीत त्याने झोपेत असलेल्या श्रीदेवीला फेकून दिले. घरी आल्यावर भाऊ भीमराव यांनी श्रीदेवीबाबत त्याला विचारले. यावर अण्णाप्पाने तिला विहिरीत टाकल्याचे सांगितले. भीमराव कोळी यांनी लगेच कुरळप पोलिसात फिर्याद दिली.तिचा विहिरीत शोध घेतला. पण, पाण्यात बुडाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी अण्णाप्पा कोळीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला कुरळप पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलिस कोठडी देण्यात आली.

रात्रभर शोध, सकाळी मृतदेह सापडलाइस्लामपूर उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मा कदम, साहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक जाधव, अनिल पाटील यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन रात्री दोनपर्यंत पाहणी केली. मात्र, विहिरीत पाणी जास्त असल्यामुळे श्रीदेवी दिसून आली नाही. विद्युत मोटारींनी रात्रभर पाणी उपसा केल्यानंतर सकाळी सात वाजता तिचा मृतदेह दिसून आला.

चुलत्याला शोक अनावरचार वर्षांच्या श्रीदेवीचा मृतदेह विहिरीत उतरून चुलते भीमराव कोळी यांनी बाहेर काढला. यावेळी त्यांना शोक अनावर झाला होता. ते दृश्य मन हेलावून टाकणारे होते. बापाने चिमुकलीचा बळी घेतल्याच्या कृत्याने परिसरात हळहळ व्यक्त होत होती.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस