चार चोरटे झाले कॅ मेऱ्यात कै द
By Admin | Updated: April 20, 2015 00:10 IST2015-04-19T23:33:43+5:302015-04-20T00:10:57+5:30
व्यापाऱ्याला लुटले : चेहरे स्पष्ट दिसल्याने तपासाला गती

चार चोरटे झाले कॅ मेऱ्यात कै द
सांगली : येथील मार्केट यार्डातील मका व्यापारी प्रभूदास त्रंबडीया यांची साडेतीन लाखांची रोकड हातोहात लंपास करणारे संशयित चौघे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. एचडीएफसी बँकेबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत. त्रंबडीया यांची रोकड लंपास करण्यापूर्वी त्यांनी एका ग्राहकाच्या मानेवर खुजलीचा स्प्रे मारल्याचे दिसते. मात्र संशयितांचे चेहरे स्पष्टपणे दिसत नसल्याने त्यांचा शोध घेणे आव्हान बनले आहे.
प्रभूदास त्रंबडीया व्यवसायाच्या कामासाठी साडेतीन लाखांची रोकड काढण्यासाठी सकाळी अकरा वाजता पुष्पराज चौकातील एचडीएफसी बँकेत गेले होते. रोकड काढून ते साडेअकरा वाजता बँकेतून बाहेर पडले. रोकड त्यांनी रेक्झीनच्या बॅगेत ठेवली होती. ही बॅग त्यांनी दुचाकीला अडकविली. शहरात काम असल्याने ते राममंदिरच्या दिशेने येत होते. राममंदिरजवळ आल्यानंतर त्यांना मानेवर खाज सुटली होती. काय झाले आहे हे पाहण्यासाठी ते थांबले. तेवढ्यात गाडीला लावलेली पिशवी त्यांना दिसली नाही. त्यावेळी गाडीला बॅग नसल्याचा प्रकार उघडकीस आला होता. बँकेच्या बाहेर संशयित त्यांच्या पुढे-मागे घुटमळत असल्याचे फुटेजमध्ये दिसते. त्रंबडीया दुचाकीवर बसल्यानंतर संशयितांनी त्यांच्या मानेवर खुजलीचा स्प्रे मारल्याचा संशय आहे.
खाजवायला सुरुवात झाल्यानंतर त्रंबडीया यांनी ज्यावेळी दुचाकी थांबविली, त्यावेळी संशयितांनी दुचाकीवरून येऊन गाडीला अडकवलेली पैशाची बॅग हातोहात लंपास केली असण्याची शक्यता आहे. हा प्रकार तीन-चार सेकंदात घडला.
यामुळे त्रंबडीया यांच्याही लक्षात आला नाही. एक संशयित दुचाकीवरून बँकेच्या वाहन पार्किंगमध्ये आल्याचे दिसून येते. त्याच्या पाठीवर सॅक होती. चौघेही बँकेच्या आत-बाहेर करीत होते. त्रंबडीया यांना लुटण्याचे निश्चित केल्यानंतर ते बँकेच्या बाहेर घुटमळत होते. फुटेजमध्ये त्यांचे चेहरे स्पष्टपणे दिसत नसल्याने त्यांचा शोध घेणे आव्हान बनले आहे. गुन्हे प्रगटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
एकच टोळी सक्रिय
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही बँकेतून रोकड काढून बाहेर पडलेल्या ग्राहकांना लुटल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या प्रत्येक लुटीत त्रंबडीया यांची रोकड लंपास करणाऱ्या संशयितांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहेत. संशयित हे बाहेरील जिल्ह्यातील असावेत, असा संशय आहे. त्याद्दष्टीने तपास सुरू आहे. मात्र आतापर्यंत एकाही गुन्ह्याचा छडा लावण्यात शहर व विश्रामबाग पोलिसांना यश आले नाही. दोन दिवसांपूर्वी तासगाव पोलिसांनी ओरिसामधील तिघांच्या टोळीला पकडले होते. तोपर्यंत शहरात आणखी एक लुटीची घटना घडली.