शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी येत नाही अन् बोलणार पण नाही" असं म्हणणाऱ्या भोजपुरी अभिनेता पवन सिंहचा भाजपात प्रवेश
2
फिलीपीन्समध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या
3
मी आठ युद्धे थांबवली, नोबेल न मिळाल्यास..; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
4
फेरारी कार नाही, फेरारी कंपनीच्या मालकीवरून आई-मुलगा पुन्हा आमनेसामने; आजोबांचे नवे मृत्यूपत्र समोर आले अन्...
5
आम्हाला अजूनही अटकेच्या आदेशाची प्रत मिळाली नाही; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचा दावा
6
Video - "एक, दोन रुपये तरी द्या..."; इन्फ्लुएन्सर iPhone 17 Pro Max घेण्यासाठी मागतेय डोनेशन
7
कोण आहेत आशीष पांडे आणि कल्याण कुमार? मोदी सरकारनं 'या' पदावर केली नियुक्ती
8
RBI MPC Policy Live: दिवाळीत कर्ज महागच! EMI कमी होण्याची वाट पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास; रेपो दर 'जैसे थे'
9
मूर्ती लहान पण कीर्ती महान! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली; ऑस्ट्रेलियाविरुद्ध विक्रमी शतक
10
Zubeen Garg : "७ दिवसांत बाहेर येईल मृत्यूमागचं सत्य"; सिंगर झुबीन गर्गच्या पत्नीच्या संशयावरुन मॅनेजरला अटक
11
Asia Cup 2025: ' ट्रॉफी पाहिजे तर...',  बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट...
12
७५ वर्षाचा नवरदेव अन् ३५ वर्षाची नवरी; लग्नाच्या रात्रीच वृद्ध पतीचा मृत्यू, घातपाताचा संशय
13
AUS W vs NZ W, ICC Women’s World Cup 2025, Live Streaming : न्यूझीलंडसमोर ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान, कारण...
14
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनची वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
15
"माझ्या वडिलांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...", 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली- "मी त्यांना..."
16
बनावट नोटाचा 'बाजार'; कोणत्या राज्यात सर्वाधिक छपाई, महाराष्ट्र कोणत्या गुन्ह्यांमध्ये पहिला?
17
आजपासून UPI पेमेंटचं महत्त्वाचं फीचर बंद; आता थेट पैसे मागता येणार नाहीत!
18
Sonam Kapoor Pregnant: दुसऱ्यांदा आई होणार सोनम कपूर? 'वायू'च्या जन्मानंतर कुटुंबात पुन्हा चिमुकल्या पाहुण्याची चाहुल
19
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
20
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल

आषाढी वारीसाठी गुजरात ते मिरज चार विशेष रेल्वेगाड्या, वेळापत्रक कसे.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 18:24 IST

मिरज : पंढरपूरला आषाढीवारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी गुजरातमधील उधना ते मिरजदरम्यान पंढरपूरमार्गे विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत. दि. ५ व ...

मिरज : पंढरपूरला आषाढीवारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी गुजरातमधील उधना ते मिरजदरम्यानपंढरपूरमार्गे विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत. दि. ५ व ६ जुलै रोजी या चार जादा रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत.उधना-मिरज क्रमांक ०९०७९ या विशेष रेल्वेच्या चार फेऱ्या होणार आहेत. ही विशेष रेल्वे दि ४ जुलै रोजी उधना येथून रात्री ११:२५ वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी पंढरपूर येथे ३:५० वाजता सकाळी ६ वाजता मिरजेत पोहोचेल. रेल्वे क्रमांक ०९०८० दि. ५ रोजी सकाळी ९:१० वाजता मिरजहून निघेल. पंढरपूर येथे सकाळी ११:५० व दुसऱ्या दिवशी पहाटे ४:०० वाजता उधना येथे पोहोचेल. या गाडीस ४ स्लीपर बोगी, १३ जनरल बोगी व १ ब्रेक व्हॅन आहे. क्रमांक ०९०८१ विशेष रेल्वे दि. ५ रोजी उधना येथून रात्री ११:२५ वाजता निघेल व दुसऱ्या दिवशी पंढरपूर येथे दुपारी ३:५० वाजता व सकाळी ६:०० वाजता मिरज येथे पोहोचेल. 

विशेष रेल्वे क्रमांक ०९०८२ दि. ६ रोजी सकाळी ९:१० वाजता मिरजेतून निघेल. पंढरपूर येथे सकाळी ११:५० वाजता व दुसऱ्या दिवशी पहाटे ४:०० वाजता उधना येथे पोहोचेल. या गाडीस ६ स्लीपर , १४ जनरल बोगी क्लास, २ गार्ड ब्रेक व्हॅन आहे.

सहाही रेल्वेगाड्यांना मिरज थांबाया विशेष रेल्वेगाड्यांना बारडोली, व्यारा, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर व मिरज येथे थांबा आहे.

तीन विशेष गाड्याआषाढी वारीला पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेतर्फे दि ०१ ते १० पर्यंत पुणे ते मिरज, मिरज ते नागपूर व मिरज ते लातूर अशा तीन आषाढी विशेष गाड्या धावणार आहेत.असे आहे विशेष गाड्यांचे वेळापत्रक

  • पुणे-मिरज एकेरी विशेष रेल्वे क्रमांक ०१४१३ दि. ०८ रोजी पुणे येथून सकाळी ७:०० वाजता सुटेल व मिरजेत दुपारी १२:३० वाजता पोहोचेल. या गाडीला लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी व सांगली येथे थांबा आहे. 
  • मिरज-नागपूर एकेरी विशेष रेल्वे क्रमांक ०१२१३ दि. ०८ रोजी मिरज येथून दुपारी १२:५५ वाजता सुटेल व नागपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२:२५ वाजता पोहोचेल. या गाडीला आरग, सलगरे, कवठेमहांकाळ, ढालगाव-जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, सांगोला, पंढरपूर, कुर्डुवाडी, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, पंढरगाव, चांदगाव, अकोला, मूर्तिजापूर येथे थांबा आहे. 
  • मिरज-लातूर एकेरी विशेष रेल्वे क्रमांक ०१४०९ दि. ०६ रोजी मिरज येथून सकाळी ९:३० वाजता सुटेल व लातूर येथे त्याच दिवशी रात्री ७:२० वाजता पोहोचेल.