दिवाळीसाठी चार विशेष एक्स्प्रेस
By Admin | Updated: October 16, 2014 22:54 IST2014-10-16T22:26:19+5:302014-10-16T22:54:18+5:30
रेल्वेला प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याने मध्य रेल्वे मिरज ते यशवंतपूरदरम्यान

दिवाळीसाठी चार विशेष एक्स्प्रेस
मिरज : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी मिरज ते यशवंतपूर (बेंगलोर) दरम्यान दि. २१ ते २६ आॅक्टोबर दरम्यान चार विशेष एक्स्प्रेस रेल सोडण्यात येणार आहेत. यातील दोन सुपरफास्ट एक्स्प्रेस आहेत.
दिवाळी सणाला जाण्यासाठी रेल्वेला प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याने मध्य रेल्वे मिरज ते यशवंतपूरदरम्यान चार जादा रेल्वे गाड्या सोडणार आहे. दि. २१ रोजी गाडी क्रमांक ०२६८७ ही एक्स्प्रेस यशवंतपूर येथून रात्री ८.४० वाजता सुटणार आहे. ती दुसऱ्यादिवशी सकाळी ९.३० वाजता मिरजेत पोहोचणार आहे. दि. २६ रोजी हीच एक्स्प्रेस मिरजेतून दुपारी ३.३० वाजता ०२६८८ क्रमांकाने यशवंतपूरला जाणार आहे. दुसऱ्यादिवशी पहाटे ४.१५ वाजता यशवंतपूरला पोहोचणार आहे. या सुपरफास्ट एक्स्प्रेससाठी बेळगाव, धारवाड, हुबळी, दावणगिरी व टुमकूर हे थांबे आहेत. दि. २२ रोजी गाडी क्रमांक ०६५९० दुपारी ३ वाजता मिरजेतून यशवंतपूरला जाणार
आहे. दुसऱ्यादिवशी पहाटे ४.३० वाजता ती यशवंतपूरला पोहोचणार आहे. दि. २५ रोजी ०६५८९ या क्रमांकाची एक्स्प्रेस रात्री ८.४० वाजता मिरजेला णार आहे व दुसऱ्यादिवशी सकाळी १०.१५ वाजता ती मिरजेत पोहोचणार आहे. यांचे आरक्षण सुरू आहे. (वार्ताहर)