मिरजेत गॅस्ट्रोचे आणखी चार रुग्ण
By Admin | Updated: December 2, 2014 00:12 IST2014-12-01T23:41:56+5:302014-12-02T00:12:12+5:30
४३ रुग्णांवर उपचार : आरोग्य विभाग दक्ष

मिरजेत गॅस्ट्रोचे आणखी चार रुग्ण
मिरज : मिरजेत गॅस्ट्रोची साथ नियंत्रणात असून आज शासकीय रूग्णालयात चार नवीन रूग्ण उपचारासाठी दाखल झाले. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या फिरत्या पथकाद्वारे ४३ अतिसाराच्या रूग्णांवर उपचार करण्यात आले.
रूग्णालयात चार अतिसाराचे रूग्ण दाखल असल्याचे सांगण्यात आले. गॅस्ट्रोची साथ नियंत्रणासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्वेक्षण सुरू केले असून दिंडी वेस, बोलवाड रस्ता, समतानगर यासह विविध ठिकाणी सर्वेक्षण करून ४३ अतिसाराच्या रूग्णांवर उपचार केले. दूषित पाण्याच्या तक्रारी असलेल्या ब्राह्मणपुरीसह दाट लोकवस्तीत मेडिक्लोअर या पाणी शुध्दीकरण औषधाचे वाटप करण्यात आले. पाणी पुरवठा विभागाने जुन्या जलवाहिन्यांचा पाणी पुरवठा बंद केली आहे. (वार्ताहर)
गॅस्ट्रोने कुणाचाही मृत्यू नाही
महापालिका आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण सुरूच असून दररोज अतिसाराचे रूग्ण महापालिका क्षेत्रात सापडत आहेत. मात्र गॅस्ट्रोमुळे कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचे महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी कुलकर्णी यांनी सांगितले.