शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबादास कागदोपत्री नेता, खैरेंनी आता नातवंडे सांभाळावी; संदीपान भुमरेंची उद्धवसेनेच्या नेत्यांवर निशाणा
2
DC vs MI : "शर्माजी का बेटा मॅच विनर!" पण तो कर्ण की रोहित? खरा सामना फिरवला कोणी?
3
"चूक मान्य करुन माफी मागा"; महात्मा फुलेंबाबत केलेल्या विधानावरुन सदावर्तेंचे उदयनराजेंना प्रत्युत्तर
4
IPL 2025 DC vs MI: रन आउटची हॅटट्रिक! अन् फायनली रंगतदार सामन्यात मुंबई इंडियन्सनं मारली बाजी
5
पोटगीची मागणी केल्याने पत्नीसोबत अघोरी कृत्य; गुप्तांगावर जादूटोणा केल्याचे सांगितले अन्...
6
Karun Nair : १०७७ दिवसांनी कमबॅक! इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात IPL मध्ये ७ वर्षांनी ठोकली फिफ्टी!
7
"डोक्याने क्रॅक आहेस का, मी मगासपासून..."; 'त्या' प्रश्नाने संयम सुटताच अजितदादांची तुफान फटकेबाजी
8
आई-मुलाची सकाळची भेट ठरली अखेरची; निवृत्त महिला अधिकाऱ्याची हत्या, नातेवाईक ताब्यात
9
आईच्या बॉयफ्रेंडचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; जन्मदातीने पोटच्या पोरीचे व्हिडीओ केले व्हायरल
10
DC vs MI : तिलक वर्मानं ती गोष्ट लयच मनावर घेतलीये; सलग दुसऱ्या फिफ्टीनंतर सेलिब्रेशनमध्ये तेच दिसलं!
11
'वक्फ कायद्याच्या नावाखाली लोकांना भडकवले जातेय, हिंदूंना घराबाहेर...'; मुर्शिदाबाद हिंसाचारावरून CM योगींचा हल्लाबोल
12
IPL 2025 DC vs MI : रोहित शर्माचा आणखी एक डाव ठरला फुसका: नवख्या पोरानं दिला चकवा!
13
गडकरींचा एक फोन अन् दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शासकीय मदतीचा मार्ग मोकळा
14
विदर्भाच्या माथ्यावरील दुष्काळाचा कलंक पुसायचा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
धक्कादायक! रेशन कार्ड बनवण्यासाठी गेली, वाटेतच होणाऱ्या पतीसमोर सामूहिक अत्याचार
16
RCB चा विजयी 'चौकार'! IPL ट्रॉफी विजेत्यांना घरात मात देण्याचा सेट केलाय खास पॅटर्न
17
शिक्षण घोटाळ्यात आणखी तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटक; घोटाळ्याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीपर्यंत
18
"मृत्युदंड हा इस्लामचा भाग..."; ४ जणांना गोळ्या घालून मारल्यानंतर, काय म्हणाला तालिबान नेता?
19
₹8 वरून ₹81 वर पोहचला हा शेअर, 1 लाखाचे केले ₹10.20 लाख; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
“मित्रांकडून पैसे उधार घेतले, कष्टाने पहिलं घर...”; ‘ते’ दिवस आठवून अभिनेता झाला भावुक

Sangli: शिराळा वन विभागाच्या कार्यक्षेत्रात नववर्षात चार बिबट्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 16:31 IST

१७६ पाळीव प्राण्यांचा मृत्यू

विकास शहाशिराळा : शिराळा वन विभागाच्या कार्यक्षेत्रात नवीन वर्षात चार बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. यातील दोन बिबटे विहिरीत पडल्याने, एक बिबट्या गाडीला धडकल्याने तर एका बिबट्याचा वयोवृद्ध झाल्याने मृत्यू झाला आहे. चार बिबट्यांचा मृत्यू आणि बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना चिंताजनक आहेत.रेठरे धरण (ता. वाळवा) येथे बुधवार, दि. २९ जानेवारी रोजी विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू झाला. नववर्षात दि. ४ जानेवारी रोजी नेर्ले (ता. वाळवा) येथे वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. दि. ६ जानेवारी रोजी फुपिरे येथे बिबट्याचा मृत्यू वयोवृद्ध झाल्याने झाला होता. दि. ११ जानेवारी रोजी करमाळे येथील खासगी विहिरीत पडल्याने सहा ते सात महिन्यांच्या बछडा मादीचा मृत्यू झाला. दि. २० डिसेंबर रोजी जांभळेवाडी येथील ओढ्याकाठी ५ ते ६ वर्षांचा बिबट्या मृतावस्थेत आढळला होता. या अगोदर १४ सप्टेंबर २००४ रोजी खेड तालुक्यातील आयनीमेटा येथून चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोडण्यासाठी आणलेल्या नर बिबट्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यापूर्वी चव्हाणवाडी येथील जंगलात बिबट्या मृतावस्थेत आढळला होता. २०१६ साली वाकाईवाडी येथे दोन तर वाकुर्डे खुर्द येथील सवादकरवाडी येथील शेतात एक बिबट्या मृतावस्थेत आढळला होता. १ जानेवारी २०१५ रोजी कोल्हापूर येथील रुईकर कॉलनीत धुमाकूळ घातलेल्या बिबट्याला चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोडण्यासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता.शेडगेवाडी-खुजगाव दरम्यान असलेल्या वारणा जलसेतूवरून पडून बिबट्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इटकरे (ता. वाळवा) येथे बिबट्याचा मृत्यू झाला. २०२३ ला चव्हाणवाडी येथे अर्धवट शव असणारा बिबट्या सापडला होता.

  • २७ फेब्रुवारी २०२२ ला रेठरे धरण येथे बिबट्याचा मृत्यू झाला होता. त्याचे पंजे व नख्या गायब होत्या.
  • तडवळे (ता. शिराळा) येथे बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड मजुराचा मुलगा सुफियान शमसुद्दीन शेख याचा मृत्यू झाला होता तसेच दुसऱ्या हल्ल्यात गणेश कंबोलकर हे जखमी झाले होते. काळुंद्रे (ता. शिराळा) येथील संभाजी उबाळे यांचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.
  • मे २०२० मध्ये वाकुर्डे बुद्रुक येथे बिबट्याच्या बछड्याचा वाहन अपघातात मृत्यू झाला. काळामवाडी येथे अपघातात बिबट्यांचा मृत्यू झाला होता.

१७६ पाळीव प्राण्यांचा मृत्यूशित्तुर येथील शेतकरी पांडुरंग कदम यांचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. शिराळा तालुक्यातील मणदूर येथील अंतु पाटील, ज्ञानदेव लाखन, विठ्ठल कुले, बनाबाई कदम, नामदेव मिरुखे, सर्जेराव पाटील, अशोक विष्णू सोनार हे गव्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झाले होते. १७६ पाळीव प्राण्यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीleopardबिबट्याforestजंगलforest departmentवनविभाग