सांगलीत मारहाणीत चारजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:06 IST2020-12-05T05:06:24+5:302020-12-05T05:06:24+5:30

सांगली : शहरातील कोल्हापूर रोडवर असलेल्या केंगार गल्लीमध्ये एकाच कुटुंबातील चौघांना कौलाने मारहाण करून जखमी करण्यात आले. याप्रकरणी सतीश ...

Four injured in Sangli beating | सांगलीत मारहाणीत चारजण जखमी

सांगलीत मारहाणीत चारजण जखमी

सांगली : शहरातील कोल्हापूर रोडवर असलेल्या केंगार गल्लीमध्ये एकाच कुटुंबातील चौघांना कौलाने मारहाण करून जखमी करण्यात आले. याप्रकरणी सतीश मानसिंग केंगार याने, गणेश शत्रुघ्न केंगार, वैभव दत्तात्रय करडे, विशाल दत्तात्रय करडे (सर्व रा. केंगार गल्ली, सांगली) यांच्याविरोधात शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवार दि. १ रोजी रात्री नऊच्या सुमारास संशयितांनी फिर्यादी सतीशच्या वडिलांना, ‘आमच्या घरात का आलात’ म्हणून कौलाने कपाळावर मारले, तर सतीशलाही हनुवटीवर मारण्यात आले. तसेच भाऊ राहुल व आजी अनुसया यांनाही संशयितांनी ढकलून देत जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेची शहर पोलिसात नोंद असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Four injured in Sangli beating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.