शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावरील अफवा प्रकरणी कोल्हापूरच्या चार ग्रुप अ‍ॅडमिनना अटक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 21:12 IST

सोशल मीडियावरुन जुन्या घटनांची चित्रफीत व्हायरल  केल्याप्रकरणी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कोल्हापूर जिल्ह्यात छापे टाकून व्हॉटस् अ‍ॅप ग्रुुपच्या चार  अडमिनना प्रतिबंधात्मक कारवाईखाली अटक केली आहे.

सांगली, दि. 4 -  सोशल मीडियावरुन जुन्या घटनांची चित्रफीत व्हायरल  केल्याप्रकरणी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कोल्हापूर जिल्ह्यात छापे टाकून व्हॉटस् अ‍ॅप ग्रुुपच्या चार  अडमिनना प्रतिबंधात्मक कारवाईखाली अटक केली आहे. रविवारी याच ग्रुपमधील चौघांना अफवा पसरविल्याप्रकरणी अटक केली होती.अटक केलेल्यामध्ये नितीन कुबेर जोग (वय २८), उमेश धोंडीराम जोग (२७, दोघे रा. माणगाव, ता. हातकणंगले), विजय बाळासाहेब चौगुले (२०) व सौरभ सारंग चौगुले (१९, उचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांचा समावेश आहे. नितीश व उमेश जोग  दुश्मनोंका आशिर्वाद  या ग्रुपचे, तर विजय व सौरभ चौगुले  एबीएस तालीम  ग्रुपचे अ‍ॅडमिन आहेत. ग्रुपचे अ‍ॅडमिन म्हणून या चौघांची जबाबदारी आहे. त्यांनी त्यांच्या ग्रुपवर अफवा पसरविणारी चित्रफीत पडल्यानंतर स्थानिक पोलिसांना याची माहिती देणे आवश्यक होते. पण त्यांनी तसे केले नाही. उलट त्यांच्या ग्रुपवर पडलेल्या या चित्रफीतचा दुसºया ग्रुपवर झपाट्याने प्रसार झाला. त्यामुळे ग्रुप अ‍ॅडमिनवरही कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक राजन माने यांच्या पथकाने रविवारी रात्री कोल्हापूर जिल्ह्यातील उचगाव व माणगाव येथे छापे टाकून चार अ‍ॅडमिनना अटक केली. दोन दिवसात छडागणशोत्सवाच्या धामधूमीत जुन्या घटनांच्या चित्रफीत सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. त्यामुळे पुन्हा अनुचित प्रकार घडला की काय? अशी लोकांमध्ये शंका निर्माण झाली. ते एकमेकांना संपर्क साधून चौकशी करुन लागले. ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. पण अफवा पसरविणाºयांवर कारवाई केली पाहिजे, या उद्देशाने पोलिसांनी दोन दिवसाचा याचा छडा लाऊन सहाजणांना अटक केली. कोल्हापूर पोलिसांनीही दोघांना अटक केली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस