सांगलीत लाकडी बांबूने चौघांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:47 IST2021-02-06T04:47:51+5:302021-02-06T04:47:51+5:30
सांगली : पैशाच्या देवाणघेवाणीतून चौघांना लाकडी बांबूने मारहाण केल्याची घटना शहरातील शिवशंभो चौकात मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी ...

सांगलीत लाकडी बांबूने चौघांना मारहाण
सांगली : पैशाच्या देवाणघेवाणीतून चौघांना लाकडी बांबूने मारहाण केल्याची घटना शहरातील शिवशंभो चौकात मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी चार जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुमैय्या सय्यद (वय २०, रा. मुंब्रा, सध्या शिवशंभो चौक) यांनी फिर्याद दिली आहे.
आशिष रमेश तिवारी (वय ३०, मूळ गोरेगाव), शुभम प्रदीप दुबे (२२, मूळ दादर), प्रवीण विश्वनाथ आरते (३१, कर्नाळ रोड), अमर रमेश मोरे (२७, रा. रामनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. फिर्यादी सुमैय्या सय्यद या मंगळवारी पती, नणंद, मित्रासोबत मुंबईला निघाल्या होत्या. यावेळी शिवशंभो चौकात संशयितांनी त्यांना अडवून पैशाच्या देवाणघेवाणीतून पतीस शिवीगाळ केली. तसेच सुमैय्या यांना लाकडी बांबूने मारहाण केली. मित्र रिहान शेख हा भांडण सोडविण्यासाठी गेला असता त्यालाही बांबूने मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.