शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

निवृत्त कामगारांच्या देण्यांसाठी चार पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 1:01 AM

सांगली : वसंतदादा कारखान्याच्या निवृत्त कामगारांची ३६ कोटी रुपयांची देणी देण्यास कारखाना व दत्त इंडिया कंपनीने तयारी दर्शविली असून, त्यासाठी चार पर्याय कामगारांसमोर ठेवण्यात येणार आहेत. मंगळवारी दुसºया संघटनेशी चर्चा केल्यानंतर हे पर्याय खुले करण्यात येणार आहेत.सोमवारी शेतकरी संघटनेचे संजय कोले, सुनील फराटे यांच्याशी वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील व ...

सांगली : वसंतदादा कारखान्याच्या निवृत्त कामगारांची ३६ कोटी रुपयांची देणी देण्यास कारखाना व दत्त इंडिया कंपनीने तयारी दर्शविली असून, त्यासाठी चार पर्याय कामगारांसमोर ठेवण्यात येणार आहेत. मंगळवारी दुसºया संघटनेशी चर्चा केल्यानंतर हे पर्याय खुले करण्यात येणार आहेत.सोमवारी शेतकरी संघटनेचे संजय कोले, सुनील फराटे यांच्याशी वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील व दत्त इंडियाचे संचालक जितेंद्र धारू यांनी चर्चा केली. तासभर चाललेल्या या बैठकीत निवृत्त कामगारांची सुमारे ३६ कोटी रुपयांची थकीत देणी देण्याबाबत कंपनी व कारखाना प्रशासनाने तयारी दर्शविली. ही देणी देण्यासाठी वेगवेगळे चार पर्याय त्यांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांसमोर मांडले. यातील एका पर्यायाबाबत संघटनेने सकारात्मकता दर्शविली आहे. मात्र त्याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय कळविण्यात येईल, असे कोले यांनी सांगितले. या पर्यायानुसार वसंतदादा कारखान्याची काही मालमत्ता तारण ठेवून कामगारांच्या नावे जिल्हा बँकेतून कर्ज काढण्याचा आणि थकीत रकमेला दत्त इंडिया कंपनीची हमी घेण्याचा हा पर्याय आहे.हा पर्याय निवडला गेला, तर कामगारांना एकरकमी सर्व रक्कम दिली जाणार आहे. अन्यथा अन्य तीन पर्यायांबाबत कारखाना त्यांच्याशी चर्चा करेल. अन्य तीन पर्याय काय आहेत, याबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे. अ‍ॅड. के. डी. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कृती समितीशी मंगळवारी चर्चा झाल्यानंतर सर्व पर्याय खुले करण्यात येतील, असे कारखाना अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. जिल्हा बँकेच्या कर्जाबाबतचा पर्याय कायदेशीरदृष्ट्या अडचणीचा आहे की चांगला, याबाबतचा सल्ला कायदेतज्ज्ञांकडून घेण्यात येईल, असे शेतकरी संघटनेच्या लोकांनी सांगितले.त्यामुळे येत्या चार दिवसात कामगारांच्या देण्यांबाबतचा निर्णय होण्याची चिन्हे आहेत. या बैठकीस शेतकरी संघटनेचे वसंतराव सुतार, रावसाहेब दळवी, बाळासाहेब पाटील, मोहन परमणे, वसंत लिमये, संपत सूर्यवंशी, मोहन पाटील आदी उपस्थित होते.देण्यांची यादी : खातरजमा करा!निवृत्त कामगारांच्या थकीत देण्यांबाबतची यादी कारखाना कार्यस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील कामगारांचे नाव व त्याची थकीत रक्कम याबाबत खातरजमा करून, त्याबाबत काही शंका असल्यास त्यांनी कारखाना प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी बैठकीत करण्यात आले. शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनीही त्याबाबतची कल्पना निवृत्त कामगारांना दिली.कामगारांना कल्पनाबैठकीनंतर संजय कोले यांनी निवृत्त कामगारांशी चर्चा केली. त्यांना याबाबतची सर्व कल्पना दिली. येत्या चार दिवसात कारखाना सर्व पर्याय खुले करणार आहे. त्यानंतर शेतकरी संघटना कामगारांसोबत चर्चा करून योग्य पर्याय निवडेल. काही निवृत्त कामगारांनी पुन्हा शंका उपस्थित केल्या. त्यावर कोले म्हणाले की, चार दिवसात काय होते ते पाहून निर्णय घेण्यात येईल.