सांगलीत माता रमाई आंबेडकर उद्यानाची पायाभरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:29 IST2021-05-27T04:29:45+5:302021-05-27T04:29:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क संजयनगर : सांगलीत प्रभाग क्रमांक १० मधील माता रमाबाई आंबेडकर उद्यानाची पायाभरणी गौतम बुद्ध जयंतीदिनी ...

Foundation stone of Sangli Mata Ramai Ambedkar Udyan | सांगलीत माता रमाई आंबेडकर उद्यानाची पायाभरणी

सांगलीत माता रमाई आंबेडकर उद्यानाची पायाभरणी

लोकमत न्यूज नेटवर्क

संजयनगर : सांगलीत प्रभाग क्रमांक १० मधील माता रमाबाई आंबेडकर उद्यानाची पायाभरणी गौतम बुद्ध जयंतीदिनी झाली.

महापौर दिग्विजय सूर्यवंशी, रिपाईचे राज्य सचिव विवेक कांबळे, पृथ्वीराज पवार, स्नेहल सावंत, संजय देसाई, चंद्रकांत आडके, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, अनारकली कुरणे, वर्षा निंबाळकर, प्रकाश मुळके उपस्थित होते.

नगरसेवक ठोकळे यांच्या प्रयत्नातून सांगलीच्या मध्यवर्ती ठिकाणी सुमारे सव्वा एकर जागेत हे उद्यान साकारणार आहे. या उद्यानात भीमा-कोरेगाव येथील ऐतिहासिक क्रांतिस्तंभाची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे.

भारतीय बौद्ध महासभेचे जितेंद्र कोलप यांनी बुद्धवंदना घेतली. सूत्रसंचालन हणमंत साबळे यांनी केले.

यावेळी रिपाई महिला आघाडी जिल्हाध्यक्षा छाया सर्वदे, बीरेंद्र थोरात, प्रा. रवि ढाले, विनायक कांबळे, प्रमोद कुदळे, प्रा. अशोक भटकर, पारमित धम्मकिर्ती उपस्थित होते.

फोटो ओळ : सांगलीत माता रमाबाई आंबेडकर उद्यानाची पायाभरणी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, विवेक कांबळे, पृथ्वीराज पवार, स्नेहल सावंत, जगन्नाथ ठोकळे यांच्या उपस्थितीत झाली. (छाया : सुरेंद्र दुपटे)

Web Title: Foundation stone of Sangli Mata Ramai Ambedkar Udyan