सुरेंद्र दुपटे संजयनगर /सांगली : गौतमबुद्ध जंयतीदिनी सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रंमाक १० मधील माता रमाबाई आंबेडकर उद्यानाचा पायाभरणी शुभारंभ महापौर दिग्विजय सुर्यवंशी, महापालिकेचे माजी महापौर नगरसेवक, रिपाईचे राज्य सचिव विवेक कांबळे, युवा नेते पृथ्वीराज पवार,समाजकल्याण सभापती स्नेहल सावंत,शहर अभियंता संजय देसाई,नगरसचिव चंद्रकांत आडके या प्रभागातील नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, प्रकाश मुळके, नगरसेविका अनारकली कुरणे, वर्षा निंबाळकर यांच्या उपस्थितीत झाला.रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस, महापालिकेचे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या प्रयत्नातून सांगलीच्या मध्यवर्ती ठिकाणी सुमारे सव्वा एकर जागेत हे उद्यान साकारणार असून माता रमाई आंबेडकर यांचे नांवे होणारे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व प्रशस्त उद्यान आहे. या उद्यानात भिमा-कोरेगांव येथील ऐतिहासिक क्रांतीस्तंभाची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. याकामाचा शुभारंभ प्रशासनाच्या निर्बंधाचे पालन करून मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी प्रांरभी गौतमबुद्ध यांना अभिवादन करण्यात आले.भारतीय बौध्द महासभेचे जितेंद्र कोलप यांनी बुध्द वंदना घेतली. सुत्रसंचालन हणमंत साबळे यांनी केले. यावेळी रिपाई महिला आघाडी जिल्हाध्यक्षा छाया संतोष सर्वदे, माजी नगरसेवक बिरेंद्र थोरात, प्रा.रवि ढाले, विनायक कांबळे, प्रमोद कुदळे, प्रा.अशोक भटकर, पारमित धम्मकिर्ती, शहाजी मोरे,किरणराज कांबळे, प्रा.राजू सावंत, जमीर कुरणे, आशिष उर्फ मनोज गाडे, माणिक गस्ते, सुरेश जाधव, बाजीराव गस्ते, अशोक मासाळे, सुरेश चौधरी, शिवाजी वाघमारे, गणपती चवडीकर, अशोक कांबळे, हरिभाऊ सवणे, नितेश वाघमारे, प्रभाकर नाईक, अशोक ठोकळे, संतोष वाघमारे, आप्पासाहेब साबळे, शंकर कांबळे, मालन नागराळे, मिलिंद गाडे, अनिल साबळे, रमेश सावंत, महावीर माने, सुशांत कांबळे, सुनिल कांबळे, प्रकाश कांबळे, श्रीकांत माने, राहुल शिंदे, संभाजी शिवशरण, राजू ठोकळे, विशाल चंदनशिवे यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील मान्यवर,विविध पक्षाचे संघटनांचे पदाधिकारी उपस्थितीत होते.
सांगलीतील माता रमाई आंबेडकर उद्यानाचा पायाभरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 17:53 IST
Muncipal Corporation Sangli : गौतमबुद्ध जंयतीदिनी सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रंमाक १० मधील माता रमाबाई आंबेडकर उद्यानाचा पायाभरणी शुभारंभ महापौर दिग्विजय सुर्यवंशी, महापालिकेचे माजी महापौर नगरसेवक, रिपाईचे राज्य सचिव विवेक कांबळे, युवा नेते पृथ्वीराज पवार,समाजकल्याण सभापती स्नेहल सावंत,शहर अभियंता संजय देसाई,नगरसचिव चंद्रकांत आडके या प्रभागातील नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, प्रकाश मुळके, नगरसेविका अनारकली कुरणे, वर्षा निंबाळकर यांच्या उपस्थितीत झाला.
सांगलीतील माता रमाई आंबेडकर उद्यानाचा पायाभरणी
ठळक मुद्देसांगलीतील माता रमाई आंबेडकर उद्यानाचा पायाभरणी