शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील यांचे निधन

By अशोक डोंबाळे | Updated: September 19, 2023 13:52 IST

दरीबडची /संख : सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संख (ता. जत) येथील बसवराज सिद्दगोंडा पाटील (वय ६५) यांचे मंगळवारी ...

दरीबडची /संख : सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संख (ता. जत) येथील बसवराज सिद्दगोंडा पाटील (वय ६५) यांचे मंगळवारी (दि.१९) रोजी सकाळी विजापूर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले.बसवराज पाटील यांचा दि. १ जून १९५८ रोजी जन्म झाला. वडील बापूराया (सिद्दगोंडा) पाटील हे मुलकी पोलिसपाटील होते. जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी निवड झाली. सरपंच पदापासून ते उपाध्यक्ष पदापर्यंतचा ४६ वर्षांचा राजकीय प्रदीर्घ असा कालखंड आहे. मनमिळावू अभ्यासू, संयमी, कुशल संघटन चातुर्य, अजातशत्रू व द्रष्ट्या नेता म्हणून परिसरात ओळख होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण संख येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये, माध्यमिक शिक्षण जत हायस्कूल येथे झाले. राजारामबापू पाटील यांच्याबरोबर १८ वर्षे काम केले. त्यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून २० वर्षे काम केले. १९७७ मध्ये जनता पक्षातून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनी जनता पक्षाचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले. २००७ च्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये संख गटातील तिन्ही जागा जिंकल्या होत्या. १९८९ मध्ये निलांबिका बसवेश्वर शिक्षण संस्थेची स्थापना केली. २००४ मध्ये जनसुराज्य पक्षात प्रवेश केला. जनसुराज्य शक्ती पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख म्हणून काम केले. २०१२ मध्ये राष्ट्रवादी जनसमुदाय पक्षाची युती झाली. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित तीन मुली, मुलगा, सून, भाऊ, पुतण्या, नातवंडे असा परिवार आहे. उपसरपंच, सोसायटी संचालक सुभाष पाटील यांचे वडील होते. अंत्यसंस्कार बुधवारी दुपारी १२ वाजता होणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीDeathमृत्यू