शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: माजी खासदार संजय पाटील गटाच्या नगराध्यक्षसह तीन नगरसेवक भाजपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 19:18 IST

प्रलंबित विकासासाठी भाजप प्रवेश

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ नगरपंचायतीचे नगराध्यक्ष रणजित घाडगे, तसेच नगरसेवक सिंधुताई गावडे, मीराबाई ईश्वर व्हनखडे, संजय माने या तीन नगरसेवकांचा भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश झाला. नगराध्यक्ष व तीन नगरसेवक यांच्या भाजप प्रवेशाने माजी खासदार संजय पाटील यांना जोरदार झटका बसला असून, त्यांच्या नगरपंचायतीमधील सत्तेला यानिमित्ताने हादरा बसला आहे. गेल्या अनेक दिवसापासून नगराध्यक्षांसह नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे चर्चा सुरू होत्या. काल या चर्चांना पूर्णविराम देत, रणजित घाडगे यांच्यासह तीन नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, भाजपचे कवठेमहांकाळ तालुका अध्यक्ष उदय भोसले, राहुल गावडे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे हा पक्ष प्रवेश पार पडला. नगराध्यक्षांसह तीन नगरसेवकांनी संजय पाटील यांचे नेतृत्व झुगारत भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेतला आहे. हा संजय पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे.यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, देशभरात भाजपचे वातावरण आहे. तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत जिल्ह्यापासून राज्यापर्यंत आणि दिल्लीपर्यंत भाजप शासन आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्षात येऊन आपल्या भागाचा विकास करावा. कवठेमहांकाळ नगरपंचायतीचे नगराध्यक्ष रणजित घाडगे व नगरसेवकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून नगरपंचायतीला कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

प्रलंबित विकासासाठी भाजप प्रवेशशहरांमधील प्रलंबित विकासकामे पूर्णत्वास नेण्यासाठी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याचे नगराध्यक्ष रणजित घाडगे यांनी सांगितले. शहराच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. या विकास निधीतून शहराचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे घाडगे यांनी सांगितले.