वशी येथील माजी आमदार शिवाजीराव नाईक गट राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:26 IST2021-01-08T05:26:48+5:302021-01-08T05:26:48+5:30

वशी : वशी (ता. वाळवा) येथील माजी आमदार शिवाजीराव नाईक गटाचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांच्यासह अनेक ...

Former MLA from Vashi Shivajirao Naik group will join NCP | वशी येथील माजी आमदार शिवाजीराव नाईक गट राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार

वशी येथील माजी आमदार शिवाजीराव नाईक गट राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार

वशी : वशी (ता. वाळवा) येथील माजी आमदार शिवाजीराव नाईक गटाचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांच्यासह अनेक ग्रामस्थ राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश करत आहेत. यामुळे माजी आमदार शिवाजीराव नाईक गटाला मोठे खिंडार पडले आहे. मतदारसंघातील वाळवा तालुक्यातील ५२ गावांमध्ये एकमेव वशी गावात शिवाजीराव नाईक गटाची सत्ता गेली अनेक वर्षें आहे. अनेकांनी प्रयत्न करूनही येथे सत्ता बदल करता आला नाही. परंतु येथील जिल्हा परिषद सदस्य संजीव पाटील व राजारामबापू पाटील कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांच्या प्रयत्नाने नाईक यांचा संपूर्ण गट राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे.

याबाबत गटाचे सतीश पाटील व उल्हास पाटील म्हणाले की, गेली अनेक वर्षे शिवाजीराव नाईक यांच्या बरोबरीने निष्ठेने काम केले; परंतु अलीकडे काळात गावच्या विकासाची कामे रखडल्याने हा निर्णय घेतला आहे. गावाच्या विकासासाठी आम्ही राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश करत आहे.

Web Title: Former MLA from Vashi Shivajirao Naik group will join NCP