शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
4
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
5
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
6
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
7
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
8
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
9
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
10
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
11
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
12
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
13
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
14
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
15
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
16
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
17
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
18
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
19
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?

विद्यमान आमदारांनी शिराळ्यातील 'शंभू स्मारकाचा' निधी रोखल्याचा माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 16:25 IST

Sangli News: स्वराज्याचे दुसरे छत्रपती, संभाजी महाराज यांच्या शिराळ्यातील तोरणा भुईकोट किल्ल्यावरील नियोजित स्मारकाचा निधी रोखून कामात अडथळा आणण्याचे 'पाप' विद्यमान आमदारांनी केले आहे, असा गंभीर आरोप माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

शिराळा - स्वराज्याचे दुसरे छत्रपती, संभाजी महाराज यांच्या शिराळ्यातील तोरणा भुईकोट किल्ल्यावरील नियोजित स्मारकाचा निधी रोखून कामात अडथळा आणण्याचे 'पाप' विद्यमान आमदारांनी केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांमार्फत गेल्या अडीच महिन्यांपासून स्मारकाचे काम हेतुपुरस्सर थांबवण्यात आले आहे, असा गंभीर आरोप माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

जर स्मारकाचे काम ३१ तारखेपर्यंत सुरू करण्याचे आदेश मिळाले नाहीत, तर १ नोव्हेंबरपासून शिराळ्यातील शिवपुतळ्यासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

'हिंदुत्वाचा नारा देणाऱ्यांनीच घातला स्मारकाला खिळ'चिखली (ता. शिराळा) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मानसिंगराव नाईक यांनी विद्यमान लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "विद्यमान लोकप्रतिनिधी हिंदुत्वाचा नारा देऊन निवडून आले आहेत. मात्र, तेच समस्त हिंदूंचा अभिमान असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामात खिळ घालत आहेत, हे दुर्दैव आहे. जणू काही हे लोकप्रतिनिधी इतिहासातील सूर्याजी पिसाळाची भूमिका बजावत असल्याचं दिसत आहे."

झाकोळलेला इतिहास जपण्याची संकल्पनानाईक यांनी स्मारकाच्या गरजेवर भर दिला. ते म्हणाले, मुघलांनी संगमेश्वर येथे संभाजी राजांना अटक केल्यानंतर त्यांना घेऊन जात असताना, इतिहासात एकमेव शिराळ्यातच त्यांना सोडवण्याचा प्रयत्न झाला होता. हा झाकोळलेला इतिहास भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरावा, यासाठी मी आमदार असताना या स्मारकाची संकल्पना मांडली होती.टप्प्याटप्प्याने विकसित होणाऱ्या या स्मारकासाठी २० कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव पाठवण्यात आला होता.

सध्या १३ कोटी ४६ लाखाचा निधी मंजूर झाला आहे.यामध्ये महाराजांचा अश्वारूढ पुतळा, तसेच शिल्प चित्रांच्या माध्यमातून संभाजी महाराजांचा जन्म ते त्यांना शिराळ्यापर्यंत कसे आणले गेले, हा संपूर्ण इतिहास मांडला जाणार आहे.शिराळकरांची ही अनेक वर्षांची मागणी होती, जी आता पूर्णत्वाच्या मार्गावर असताना अडथळे येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

'निविदा मंजुरीवर दबाव, विकासकामांना विरोध'माजी आमदार नाईक यांनी स्मारकाच्या निधी आणि कामाच्या स्थितीबद्दल माहिती दिली: राज्य शासनाकडून १३ मार्च २०२४ रोजी १३ कोटी ४६ लाख ३९ हजार ६६४ रुपयांच्या आराखड्यास मंजुरी मिळाली.त्यापैकी ९ कोटी ८५ लाख ८२ हजार रुपयांची रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आली आहे. २० जून २०२५ रोजी निविदा प्रसिद्ध झाली आणि २६ ऑगस्टला ती मंजुरीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे येथील मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे यांच्याकडे पाठवण्यात आली. नाईक यांचा आरोप आहे की, "तेव्हापासून विद्यमान लोकप्रतिनिधींनी मुख्य अभियंता  रहाणे यांच्यावर दबाव टाकून निविदेस मंजुरी होऊ दिली नाही. विकास कामे करण्यासाठी लोकप्रतिनिधी असतात, मात्र येथील लोकप्रतिनिधी हे स्मृतीस्थळ होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत."

आंदोलनाचा इशारा मानसिंगराव नाईक यांनी विद्यमान लोकप्रतिनिधींवर 'हिंदुत्वाचे नाटक' करण्याचा आणि 'लोकांच्या भावनांशी खेळण्याचा' आरोप केला. ते म्हणाले, "छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक झाल्यास झाकोळलेला इतिहास पुढे येणार, पर्यटन वाढीस चालना मिळणार आणि रोजगार निर्मिती होऊन शिराळ्याच्या विकासात भर पडणार आहे."

या महत्त्वाच्या कामास खीळ घालणाऱ्या लोकप्रतिनिधींमुळे कार्यारंभ आदेशासाठी आंदोलन करण्याची वेळ येणे, हे दुर्देव असल्याचे सांगत दि.१ नोव्हेंबरपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर तीव्र आंदोलन व निषेध व्यक्त करण्याचा  इशारा दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : MLA Accused of Blocking Funds for Shambhu Memorial in Shirala

Web Summary : Ex-MLA Mansingrao Naik alleges current MLA blocked funds for Sambhaji Maharaj memorial in Shirala. Work halted for 2.5 months. Naik threatens protest if work doesn't resume by October 31st, accusing the MLA of obstructing development and playing with people's sentiments.
टॅग्स :Sangliसांगली