खानापूरच्या माजी नगराध्यक्षांचे नगरसेवकपद रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:27 IST2021-03-23T04:27:52+5:302021-03-23T04:27:52+5:30

नगरसेवक अलीअकबर पिरजादे यांची पत्नी जमिला अलीअकबर पिरजादे यांनी गट नंबर ११४४-१ मध्ये बेकायदा बांधकाम केल्याबद्दल खानापूर नगरपंचायतीने नोटीस ...

Former mayor of Khanapur's corporator post canceled | खानापूरच्या माजी नगराध्यक्षांचे नगरसेवकपद रद्द

खानापूरच्या माजी नगराध्यक्षांचे नगरसेवकपद रद्द

नगरसेवक अलीअकबर पिरजादे यांची पत्नी जमिला अलीअकबर पिरजादे यांनी गट नंबर ११४४-१ मध्ये बेकायदा बांधकाम केल्याबद्दल खानापूर नगरपंचायतीने नोटीस बजावली होती. याबाबत पोलिसांतही तक्रार दाखल केली होती. यासंदर्भाने रहीस पिरजादे यांनी अलीअकबर पिरजादे यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे, अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली होती.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पुरावे व चौकशीवरून पिरजादे यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय दिला आहे. याप्रकरणी रहीस पिरजादे यांच्याकडून ॲड. राधिका पोतदार, दिगंबर गुरव यांनी काम पाहिले.

दरम्यान, अलीअकबर पिरजादे यांनी या निर्णयाला आव्हान दिले आहे. त्यांनी याबाबत राज्य शासनाच्या नगरविकास खात्याकडे अपील केले आहे. पिरजादे यांचे नगरसेवक पद रद्द होणे, यासंदर्भात त्यांनी केलेले अपील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Former mayor of Khanapur's corporator post canceled