वाॅन्लेसचे माजी संचालक अनिल फणसोपकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:19 IST2021-05-31T04:19:52+5:302021-05-31T04:19:52+5:30

मिरज : मिरजेतील वाॅन्लेस हॉस्पिटलचे माजी संचालक डॉ. अनिल फणसोपकर (वय ७९) यांचे निधन झाले. १९६२ मध्ये त्यांनी ...

Former director of Vanless Anil Phansopkar passes away | वाॅन्लेसचे माजी संचालक अनिल फणसोपकर यांचे निधन

वाॅन्लेसचे माजी संचालक अनिल फणसोपकर यांचे निधन

मिरज : मिरजेतील वाॅन्लेस हॉस्पिटलचे माजी संचालक डॉ. अनिल फणसोपकर (वय ७९) यांचे निधन झाले. १९६२ मध्ये त्यांनी भूलशास्त्रातील एम. डी. (ॲनास्थालॉजी) पदव्युत्तर शिक्षण ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोर येथे घेतले. त्यांनी वॉन्लेस हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवेचा प्रारंभ करुन गरीब, गरजूंची वैद्यकीय सेवा केली. त्यांनी वाॅन्लेस हॉस्पिटल, मिरज मेडिकल सेंटरचे संचालक म्हणून १९९४ ते २००० या काळात कार्यभार सांभाळला, त्यांच्या कार्यकिर्दीत वाॅन्लेस हॉस्पिटलचा शताब्दी महोत्सव तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. गरजू रुग्णांना आधुनिक उपचार मिळावेत यासाठी त्यांनी परदेशात भेटी देऊन वाॅन्लेस रुग्णालयाच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबविले. आशा या प्रकल्पाद्वारे हृदयरोग विभाग, माता बाल संगोपन व सामाजिक आरोग्य प्रकल्पांतर्गत दहा खेड्यांना दत्तक घेऊन तेथे वैद्यकीय, शैक्षणिक व समाजसेवेचा लाभ मिळवून दिला. त्यांच्या पश्चात पत्नी डाॅ. माॅली व मुलगा, मुलगी असा परिवार आहे. सोमवारी मिरज ख्रिश्चन दफनभूमीत त्यांचा अंत्यविधी करण्यात येणार आहे.

Web Title: Former director of Vanless Anil Phansopkar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.