शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: लोकसभेला विरोधातील ‘मिरज पॅटर्न’ने विधानसभेला घेतला 'यू-टर्न'; सुरेश खाडे यांना जाहीर केला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 17:34 IST

मिरज : मिरज पॅटर्नमधील माजी नगरसेवक विधानसभेला पालकमंत्री सुरेश खाडे यांचा प्रचार करणार आहेत. मिरजेतील काँग्रेस राष्ट्रवादी व लोकसभेला ...

मिरज : मिरज पॅटर्नमधील माजी नगरसेवक विधानसभेला पालकमंत्री सुरेश खाडे यांचा प्रचार करणार आहेत. मिरजेतील काँग्रेस राष्ट्रवादी व लोकसभेला विरोधात असलेल्या भाजपच्या बंडखोर माजी नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन सुरेश खाडे यांना पाठिंबा जाहीर केला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मिरज पॅटर्न मधील सर्व पक्षीय नेत्यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार केला होता. त्यावेळी सुरेश आवटी यांच्यासह भाजपच्या माजी नगरसेवकांनी लोकसभेला भूमिका वेगळी मात्र विधानसभेला सुरेश खाडे यांच्या सोबतच राहू असे सांगितले होते. आता मिरजेतील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी विधानसभेला पालकमंत्री खाडे यांच्यासोबत असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले. यावेळी सुरेश आवटी यांनी लोकसभेला पक्षाविरोधात जाऊन आम्ही पक्षाचा राजीनामा दिला. मात्र, पक्षाने राजीनामा स्वीकारला नसल्याने आम्ही भाजपमध्येच असल्याचे सांगितले.मिरजेच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिला आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री खाडे यांचा प्रचार करणार असल्याचे माजी नगरसेवकांनी जाहीर केले. यावेळी मिरज पॅटर्न मधील सर्व नगरसेवकांतर्फे पालकमंत्री सुरेश खाडे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी युवा नेते सुशांत खाडे, माजी महापौर इद्रिस नायकवडी, माजी महापौर संगीता खोत, ज्येष्ठ नेते सुरेश आवटी, माजी उपमहापौर आनंदा देवमाने, माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे, माजी नगरसेवक गणेश माळी, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, माजी नगरसेवक निरंजन आवटी, माजी नगरसेवक, संदीप आवटी, काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक संजय मेंढे, बबिता मेंढे, माजी नगरसेवक करण जामदार, अतहर नायकवडी, योगेंद्र थोरात, रिपाई युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, भाजप नेते गजेंद्र कल्लोळी, राष्ट्रवादी नेते चंद्रकांत हुलवान, भाजपचे सुमेध ठाणेदार यांच्यासह नेतेमंडळी उपस्थित होती. काँग्रेसचे संजय मेंढे व करण जामदार यांनी पालकमंत्र्यांनी विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. मात्र विधानसभेला प्रभागातील मतदारांना विचारून निर्णय घेऊ अशी सारवासारव केली.

विरोधक सोबतरिपाइं युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे यांनी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्यासोबत असलेला राजकीय वाद मिटला असल्याचे व योगेंद्र थोरात प्रभाग वीसमध्ये निवडणूक न लढविता ते प्रभाग सातमध्ये निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. लोकसभेला विरोधात असलेल्या शहरातील नेत्यांना विधानसभेला सोबत घेऊन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी विरोधकांवर मात केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

निधी देताना पक्षपात केला नाहीविकासकामासाठी निधी देताना लोकप्रतिनिधी म्हणून मी कधीच पक्षपात केला नाही. आगामी विधानसभा निवडणुकीला मिरजेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी मला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मी त्यांचे स्वागत करतो, असे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणmiraj-acमिरजBJPभाजपाvidhan sabhaविधानसभा