शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेशासाठी अनेक माजी नगरसेवक इच्छुक, इद्रिस नायकवडी यांचा दावा

By अशोक डोंबाळे | Updated: January 24, 2024 15:53 IST

भाजप व राष्ट्रवादी पक्षाची विचारसरणी भिन्न, पण..

मिरज : राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेशासाठी सांगली, मिरजेतील अनेक माजी नगरसेवक इच्छुक आहेत. मात्र त्यांचा पूर्व इतिहास व पक्षाला होणारा फायदा पाहूनच त्यांना प्रवेश मिळणार असल्याचे राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.सांगली महापालिका निवडणूक अजितदादा गट भाजपसोबत लढणार आहे. मिरजेतील काही माजी नगरसेवक मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पक्षप्रवेशाची चर्चा करतात. मात्र, येथे आल्यानंतर निधीसाठी भेट घेतल्याची सारवासारव करतात. मात्र अशांचा  पूर्व इतिहास, त्यांचा हेतू, उद्देश व पक्षास होणारा फायदा बघूनच त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश मिळेल, असेही नायकवडी यांनी माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांचे नाव न घेता सांगितले. राज्यात बार्टीच्या धर्तीवर मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची (मार्टी) स्थापना  होणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी याची घोषणा होईल. याद्वारे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षणासाठी मदत करण्यात येणार असल्याने अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचा  मोठा फायदा होणार आहे. राज्यसरकारने वक्फ बोर्डाच्या जमिनी संरक्षित करण्याचा निर्णय घेतला असून यापुढे वक्फ जमीन खरेदी-विक्री करता येणार नाही. भाजपचा विरोध असला तरी माजी मंत्री नवाब मलिक हे अजित पवार यांच्यासोबतच असून आमच्या पक्षात कोण असावे हे अजितदादाच ठरवतील. 

विचारसरणी भिन्न पण..आम्ही विकासासाठी एकत्र असल्याचे भाजप व राष्ट्रवादी या दोन पक्षाची विचारसरणी भिन्न आहे. आमची युती वैचारिक नसून राजकीय आहे. भाजपसोबत असले तरी अजितदादांनी सेक्युलर विचारसरणी सोडलेली नाही. भाजपसोबत विकासासाठी एकत्र आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अयोध्येत राममंदिराची उभारणी झाली हे चांगलेच झाले. यामुळे एक वाद संपुष्टात आला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे नाव व चिन्ह हे अजितदादा गटालाच मिळणार असल्याचा दावा नायकवडी यांनी केला.

टॅग्स :SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार