दोन वर्षाची घरपट्टी, पाणीपट्टी माफ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:54 IST2020-12-11T04:54:19+5:302020-12-11T04:54:19+5:30
फोटो १० शीतल ०१ लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गतवर्षीचा महापूर व यंदा कोरोनामुळे महापालिका क्षेत्रातील जनता भरडून निघाली ...

दोन वर्षाची घरपट्टी, पाणीपट्टी माफ करा
फोटो १० शीतल ०१
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गतवर्षीचा महापूर व यंदा कोरोनामुळे महापालिका क्षेत्रातील जनता भरडून निघाली आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी दोन वर्षाची घरपट्टी, पाणीपट्टी माफ करावी, थकीत घरपट्टीवरील संपूर्ण दंड व्याज माफ करावे, चालूवर्षी करवसुली सक्तीची करू नये, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने गुरुवारी करण्यात आली.
याबाबत आयुक्त नितीन कापडणीस, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांना निवेदन देण्यात आले. जितेंद्र शहा म्हणाले की, महापूर, कोरोना यामुळे गेल्या दोन वर्षात जनतेचे मोठे हाल झाले आहेत. जनतेला दिलासा देण्याचे काम महापालिकेने करावे. त्यासाठी घरपट्टी व पाणीपट्टीत सवलत द्यावी, महापालिका क्षेत्रात सिमेंट काँक्रिटचे रस्ते व दुभाजक करावेत, शहरातील ४० चौकात सिग्नल व्यवस्था बसवावी तसेच गल्लीतील चौकांचे सुशोभिकरण करावे, या मागण्या केल्या.
यावेळी घरपट्टी वसुलीची सक्ती केली जाणार नाही. जानेवारी महिन्यामध्ये घरपट्टी, पाणीपट्टी दंड व्याज माफीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.
यावेळी रावसाहेब घेवारे, अनिल शेटे, प्रदीप बर्गे, जितेंद्र शहा, संदीप शिंत्रे, प्रा. नंदकुमार सुर्वे, अनिल पाटील, प्रकाश लवटे, शिवम शहा उपस्थित होते.