व्यापाऱ्यांचे सर्व कर माफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:26 IST2021-04-13T04:26:11+5:302021-04-13T04:26:11+5:30

सांगली : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता राज्य शासनाकडून कडक लाॅकडाऊनचे संकेत मिळत आहेत. पण शासनाने कडक लाॅकडाऊन न करता ...

Forgive all taxes of merchants | व्यापाऱ्यांचे सर्व कर माफ करा

व्यापाऱ्यांचे सर्व कर माफ करा

सांगली : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता राज्य शासनाकडून कडक लाॅकडाऊनचे संकेत मिळत आहेत. पण शासनाने कडक लाॅकडाऊन न करता व्यावसायिकांबाबत नियमावली लागू करावी. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी. त्यातून लाॅकडाऊन करणार असालच तर राज्य व केंद्र शासनाच्या सर्व प्रकारच्या करातून व्यापाऱ्यांना सवलत द्यावी, अशी मागणी व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी सोमवारी केली.

शहा म्हणाले की, मिनी लाॅकडाऊनविरोधात राज्यातील व्यापाऱ्यांत मोठा असंतोष आहे. त्यात आता पूर्ण लाॅकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे व्यापारीवर्ग मोठ्या प्रमाणात अडचणीत येणार आहे. कर्मचाऱ्यांचे पगार, इतर खर्च आणि कर्ज व कराच्या बोजाखाली भरडला जाणार आहे. रस्त्यावरील गर्दीवर कोणताही अंकुश प्रशासनाचा दिसत नाही. मिनी लॉकडाऊन होऊनही रुग्ण वाढतच आहेत. त्यामुळे दुकाने बंद केल्याने रुग्ण वाढणार नाही, हा दावा हास्यास्पद आहे.

शासनाने कडक लाॅकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्याऐवजी दुकानदारांसाठी नवीन नियमावली लागू करावी. दुकानाची वेळ सकाळी १० ते ५ करावी. दुकानाच्या आकारमानानुसार ग्राहकांची उपस्थिती निश्चित करावी, रस्त्यावरील गर्दीवर प्रशासनाने अंकुश ठेवावा आदी उपाययोजना कराव्यात. त्यातून लाॅकडाऊनचा निर्णय घेणार असाल तर सर्वच स्थानिक, राज्य, केंद्रशासित सर्व प्रकारचे कर संपूर्ण माफ करायचा मोठेपणा शासनाने दाखवावा, अत्यावश्यक सेवेसहीत सर्वच बंद ठेवाव्यात, बँक, वित्तीय सर्वच कार्यालय, सरकारी कार्यालये बंद ठेवावीत, अशी मागणीही त्यांनी केली.

Web Title: Forgive all taxes of merchants