लाचप्रकरणी वनपालास कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:29 IST2021-05-27T04:29:27+5:302021-05-27T04:29:27+5:30
सांगली : तोडलेल्या लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीवर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात दीड हजाराची लाच स्वीकारणाऱ्या वनपालास एक दिवसाची ...

लाचप्रकरणी वनपालास कोठडी
सांगली : तोडलेल्या लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीवर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात दीड हजाराची लाच स्वीकारणाऱ्या वनपालास एक दिवसाची पोलीस काेठडी सुनाविण्यात आली. अमोल दत्तात्रय शिंदे (वय ४१, रा. साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर) असे वनपालाचे नाव आहे. शिंदे याच्यासह लाकूड वखारचालक पांडुरंग रामचंद्र खुडे (रा. पेठ ता. वाळवा) यालाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते.
मंगळवारी (दि. २५) दुपारी पेठ येथील लाकूड वखारीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून वनपाल शिंदे यास दीड हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले होते. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमानुसार त्याच्यावर इस्लामपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज, गुरुवारी त्यास न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची कोठडी सुनावण्यात आली.