शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: बोरगाव परिसरातील परदेशी सारस पक्षी परतीच्या वाटेवर; पक्षी प्रेमींना भुरळ घातली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 13:02 IST

उन्हाळ्यानंतर हिवाळ्याच्या मध्यापर्यंत कृष्णाकाठी विसावा 

नितीन पाटीलबोरगाव :आपल्याकडे परदेशी पाहुणा असणारा सारस पक्षी सध्या परतीच्या वाटेवर आहे. याच सारसने मात्र बोरगाव (ता. वाळवा) व परिसरातील पक्षी प्रेमींना भुरळ घातली आहे. या सारस पक्षांचे छायाचित्र व सौंदर्य टिपण्यासाठी पक्षी प्रेमी मोठ्या प्रमाणात इथे भेट देत आहेत. गावाच्या लगत असणाऱ्या शेकडो एकर शेतीत साचलेल्या पाणी व दलदलीवर हे प्रवासी पक्षी सध्या वावरताना दिसत आहेत.

बोरगाव एसटी बसस्थानक ते बनेवाडी फाट्यापर्यंतची शेती क्षेत्र पावसाच्या साचलेल्या पाण्याने नापीक, उजाड तसेच दलदलमय बनली आहे. याच साचलेल्या पाण्यात छोटे मासे, खेकडे, जानवे, जळू, बेडूक असे अनेक जलचर प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. या ठिकाणी अनेक परदेशी पक्षी हंगामात तळ ठोकून असतात. येथे असणारा सारस पक्षी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा पक्षी दरवर्षी उन्हाळ्यानंतर आगमन करतो व हिवाळ्याच्या मध्यात येथून निघून जातो. सध्या हिवाळ्याचा मध्यावधी कालखंड आल्याने हा पक्षी पुन्हा सातासमुद्रापलीकडे जाणार आहे. सारस पक्षी हा पांढरा शुभ्र, लांबलचक लालबुंद चोच, उंच पाय, किमान उंची १५० ते १५२ सेंटीमीटर असते. यामुळे हे सारस पक्षी परिसरातील पक्षी प्रेमींना भुरळ घालत आहे. त्याला पाहण्यासाठी येथे गर्दी ओसंडत आहे. आता या पक्षांनाही परतीचे वेध लागले आहेत. येथून हे सारस पक्षी उत्तर भारत, हिमाचल प्रदेश, नेपाळ, पाकिस्तान तसेच आफ्रिका व ऑस्ट्रेलिया या परिसरात वास्तव्य करतात.

हे सारस पक्षी वर्षभर इथून तिथे असे स्थलांतर करत राहतात. या काळात ते कृष्णाकाठावर वास्तव्य करतात. योग्य हवामान, झाडी, पाणी व खाद्य मिळत असल्याने या परिसरात ते येत असावेत. या पक्षांच्या वास्तव्यामुळे बोरगावच्या सौंदर्यात भर घातल्याने जणू पर्यटन क्षेत्राचे स्वरूप आले आहे. - रणजीत पाटील, पक्षी निरीक्षक, बोरगाव

टॅग्स :Sangliसांगली