सांगलीतील भोजन वाटपास परदेशातून मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:27 IST2021-05-12T04:27:30+5:302021-05-12T04:27:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मोफत भोजन पुरवठा करणाऱ्या शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेला परदेशातील ...

सांगलीतील भोजन वाटपास परदेशातून मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मोफत भोजन पुरवठा करणाऱ्या शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेला परदेशातील सांगलीकर व मराठी लोकांनी आर्थिक मदत दिली आहे. सांगलीच्या सामाजिक उपक्रमास यानिमित्ताने व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.
संघटनेच्या वतीने कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये होणारी गैरसोय लक्षात घेऊन गेल्या १५ दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये दाखल कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या ४०० डब्यांची दररोज व्यवस्था करण्यात येत आहे. संघटनेचे कार्यकर्ते ते नातेवाइकांपर्यंत पोहोच करीत असतात. गरजू रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडरही पुरविले जात आहेत. या सर्व कार्याची दखल घेऊन दुबईहून अभिजित संकपाळ, संदीप गुर्जर, कॅनडाहून अविनाश रेपे, सिंगापूरहून आशिष आपटे, कतारहून ज्योती खोत या भारतीय लोकांनी परदेशातून आर्थिक मदत दिली आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक चौगुले यांनी सांगितले की, शहरातील अनेक सामाजिक, धार्मिक संस्थांनीही मोठ्या प्रमाणावर मदत करण्यास सुरुवात केल्याने संघटनेला सामाजिक कार्याचे बळ मिळाले आहे.