मांगलेत कोरोना रुग्णांचे सक्तीने विलगीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:26 IST2021-05-23T04:26:29+5:302021-05-23T04:26:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मांगले : मांगले (ता. शिराळा) येथील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी कोरोना रुग्णांचे प्राथमिक शाळेत सक्तीने ...

मांगलेत कोरोना रुग्णांचे सक्तीने विलगीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मांगले : मांगले (ता. शिराळा) येथील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी कोरोना रुग्णांचे प्राथमिक शाळेत सक्तीने संस्थात्मक विलगीकरण करण्याचा निर्णय तहसीलदार गणेश शिंदे व पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत दक्षता समितीने घेतला.
तहसीलदार गणेश शिंदे म्हणाले, मांगले गावातील वाढती कोरोना रुग्ण संख्या चिंताजनक आहे. नवीन कोरोना रुग्ण हे होम क्वारंटाईन केलेल्या कोरोनाग्रस्त कुटुंबातील आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत चालली आहे. हे रोखण्यासाठी कोरोनाग्रस्त रुग्णांना मराठी शाळेत सक्तीने संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार म्हणाले, मांगलेत गेल्या दोन दिवसांपासून कडक लॉकडाऊन सुरू आहे. तरीदेखील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे.
होम क्वारंटाईन केलेल्या कोरोनाग्रस्त कुटुंबातील इतर सदस्यांना कोरोना होत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. हा वाढता प्रसार रोखण्यासाठी कोरोना रुग्णांना मांगलेतील प्राथमिक शाळेत संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. त्याला विरोध करणाऱ्यांना शिराळा येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल.
या वेळी सरपंच मीनाताई बेद्रे, उपसरपंच धनाजी नरुटे, माजी सरपंच विजय पाटील, उदय पाटील, राहुल पवार, संदीप तडाखे, एस. के. दशवंत, उत्तम गावडे, संतोष उत्तरकर - पाटील, डॉ. कैलास पाटील, प्रकाश बेंद्रे, संजय कांबळे, रमेश मोहिते, तलाठी सुभाष बागडी, ग्रामसेवक राहुल आडके आदी उपस्थित होते.