शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

Sangli: तासगावच्या राजकीय संघर्षात आटताहेत पाणी योजनांचे पाट, दिखाव्याच्या राजकारणामुळे झाला खेळखंडोबा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 17:54 IST

शेतकरी टंचाईने होरपळत असल्याचे विदारक वास्तव

दत्ता पाटीलतासगाव : प्रस्थापित नेते आणि त्यांच्या भावी पिढीच्या राजकीय सोयीसाठी तासगाव तालुक्यात श्रेयवादाचा संघर्ष पेटला आहे. नेत्यांच्या दिखाव्याच्या राजकारणामुळे तालुक्यातील पाणी योजनांचा खेळखंडोबा झाला आहे. या राजकीय संघर्षात तालुक्यातील शेतकरी टंचाईने होरपळत असल्याचे विदारक वास्तव दिसत आहे.एकेकाळी सधन समजल्या जाणाऱ्या तासगाव तालुक्याला गेल्या काही वर्षांत दुष्काळाचे ग्रहण लागले आहे. वर्षानुवर्ष पाणी योजनांचे गाजर दाखवून निवडणुका लढवणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता श्रेयवादाचे राजकारण सुरू केल्याचे दिसते. तालुक्यात पाणी योजनांचे जाळे विणलेले असले, तरी या योजनांचा पूर्णपणे खेळखंडोबा झाला आहे. नियोजनाअभावी आणि राजकीय हस्तक्षेपामुळे या पाणी योजना कुचकामी ठरलेल्या आहेत.

त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांत द्राक्ष बागायतदारांवर बागा काढून टाकण्याची वेळ यावर्षी आली आहे. अनेक ठिकाणी पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागले आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात पिण्याच्या पाण्याचे चित्र यापेक्षा विदारक आहे. जनतेने पाण्यासाठी टाहो फोडलेला असताना, तालुक्यातील लोकप्रतिनिधी मात्र श्रेयवाद घेण्यासाठी संघर्ष करताहेत.गेल्या तीन महिन्यांपासून तालुक्यात टंचाईची दाहकता आहे. याकडे भाजप आणि राष्ट्रवादीच्या प्रस्थापित नेतृत्वाने सोयीस्कर दुर्लक्ष केले. केवळ निवेदनाचे कागदी घोडे नाचवायचे, अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घ्यायच्या आणि त्याचा सोशल मीडियावर डांगोरा पिटायचा, असा एककलमी कार्यक्रम तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि भाजप, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्यांकडून सुरू आहे.तालुक्यात पाण्यासाठी वाताहात होत असल्याने शेतकरी स्वतःहून रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा घेत आहेत. अशा परिस्थितीत मिळणाऱ्या पाण्याचे श्रेय लाटण्याचा उद्योग लोकप्रतिनिधींकडून केला जात आहे.वास्तविक शेतकऱ्यांऐवजी लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर उतरणे अपेक्षित असताना केवळ श्रेयवादाचा ढोल पिटण्यात धन्यता मानली जात आहे. आमदारकी मिळवण्यासाठी केलेल्या कामाच्या श्रेयवादासाठी भाजप आणि राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार) युवा नेत्यात संघर्षाचा खेळ सुरू आहे. यात तालुक्यातील जनतेची मात्र होरपळ होत आहे.

श्रेयवाद नको, पाणी हवेतालुक्यात पाणी योजनांचे जाळे आहे. मात्र, या योजनातून पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नाही. या योजना कुचकामी ठरलेल्या आहेत. शेजारील पलूस-कडेगाव मतदारसंघात आमदार विश्वजीत कदम यांनी रस्त्यावरची लढाई लढून पाणी मिळवले. मात्र, तासगाव तालुक्यातील आमदार, खासदार आणि त्यांच्या वारसदारांनी रस्त्यावरच्या लढाई ऐवजी, श्रेयवादाचीच लढाई लढण्यास सुरू केली. त्यामुळे पाण्याचा संघर्ष कायम आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीPoliticsराजकारणsumantai patilसुमनताई पाटीलsanjaykaka patilसंजयकाका पाटील