शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: सांगली जिल्ह्यात तीन लाख कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 16:17 IST

मागणी केल्यास दाखला मिळणार

सांगली : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी जिल्ह्यात तीन लाख ९९ हजार ८८५ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आतापर्यंत दोन लाख ८९ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली. एकही कुटुंब सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही, याबाबतची दक्षता घेतली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.डॉ. राजा दयानिधी म्हणाले, राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार राज्यात मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. जिल्ह्यात पाच हजार प्रगणकांची नेमणूक केली असून, त्यांच्यामार्फत सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. प्रारंभी ॲपमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, सध्या काम गतीने सुरू आहे. जिल्ह्यातील तीन लाख ९९ हजार ८८५ कुटुंबांचे सर्वेक्षण करावे लागणार आहे. त्यापैकी मंगळवारपर्यंत दोन लाख ८९ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. अद्यापही एक लाख कुटुुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. प्रारंभी ॲपमधील तांत्रिक अडचणींमुळे सर्वेक्षणाला विलंब झाला आहे; परंतु सध्या सुरळीत काम सुरू आहे. मराठा मागासलेपणाचा सर्वेक्षण सात दिवसांत करण्याच्या सूचना आहेत. दि. ३१ जानेवारीची मुदत दिली आहे. या कालावधीत काम पूर्ण होणार नसल्याने दोन दिवस मुदत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी राज्य मागासवर्ग आयोगाकडे केली आहे. जिल्ह्यातील एकही कुटुंब सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत.

मागणी केल्यास दाखला मिळणारमराठा कुणबी दाखल्यांसाठी जेवढे अर्ज प्राप्त झाले होते. त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. सध्या एकही कुणबी प्रमाणपत्राची मागणी नाही; मात्र कुणबी दाखल्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यास पडताळणी करून तत्काळ दाखले देण्यात यावेत, अशा सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या असल्याचे डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीMaratha Reservationमराठा आरक्षण