सफाई कामगार संघटनेच्यावतीने सावली बेघर केंद्रात अन्नदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:22 IST2021-02-05T07:22:41+5:302021-02-05T07:22:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सफाई कामगार इतर संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेच्यावतीने ...

Food donation at Shadow Homeless Center on behalf of Sweepers Union | सफाई कामगार संघटनेच्यावतीने सावली बेघर केंद्रात अन्नदान

सफाई कामगार संघटनेच्यावतीने सावली बेघर केंद्रात अन्नदान

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सफाई कामगार इतर संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेच्यावतीने सांगलीतील सावली बेघर निवारा केंद्रात अन्नदान करण्यात आले. यावेळी दीडशेहून अधिक बेघरांना अन्नाचे वाटप करण्यात आले.

संघटनेच्यावतीने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संपर्कप्रमुख नितीन बानुगडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी बेघर केंद्रात जिल्हाप्रमुख संजय विभूते, कामगार नेते डॉ. महेशकुमार कांबळे, शरद सातपुते आणि मिरज शहर अध्यक्ष चंद्रकांत मैगुरे, युवा समन्वयक सचिन कांबळे यांच्याहस्ते १५० बेघरांना अन्नदान करण्यात आले.

या कार्यक्रमाचे नियोजन संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेचे राजेंद्र पाटील, विजय कात्रळे, मयूर कांबळे, राजू धेंडे, अझहर मुल्ला, सनी कांबळे, संदीप पाटील, राकेश सरवदे, दीपक बारिया, संदीप दबडे, सिद्धार्थ कांबळे, ओंकार जोशी, पप्पू शिंदे, विजय शिंदे यांनी केले होते.

Web Title: Food donation at Shadow Homeless Center on behalf of Sweepers Union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.