इस्लामपुरात अन्नदानाचा उपक्रम स्तुत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST2021-06-09T04:34:46+5:302021-06-09T04:34:46+5:30
इस्लामपूर येथे ‘एक हात माणुसकीचा’ या उपक्रमास भेट दिल्यानंतर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी सोन्या देसाई, ...

इस्लामपुरात अन्नदानाचा उपक्रम स्तुत्य
इस्लामपूर येथे ‘एक हात माणुसकीचा’ या उपक्रमास भेट दिल्यानंतर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी सोन्या देसाई, प्रा.रमेश पाटील, सुजित पवार उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूूर : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाने बाधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना आधार देण्याची सामाजिक बांधिलकी स्वीकारत येथील ‘एक हात माणुसकीचा’ या उपक्रमांतर्गत गेल्या ३५ दिवसांपासून ८ हजार जणांना मोफत जेवण देण्याचे कार्य हे कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी काढले.
येथील ‘एक हात माणुसकीचा’ हा उपक्रम राबविणाऱ्या सोन्या देसाई, विजय गावडे, सुजित पवार व त्यांच्या सहकाऱ्यांची जयंत पाटील यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना मानसिक आधार देण्याचे मोठे काम केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. पाटील यांच्यासोबत नगरसेवक खंडेराव जाधव, माजी नगराध्यक्ष भगवानराव पाटील उपस्थित होते.
यावेळी किसाननगर, अक्षर कॉलनी, दत्तनगर येथील महिला, युवक आणि नागरिकांसह संजय वीरकर, प्रदीप देसाई, प्रा.रमेश पाटील, सागर जाधव, सचिन पवार, सुधीर कापूरकर, अमोल पाटील, रोहन कांबळे, रामदास कचरे उपस्थित होते.